
‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाचे औचित्य साधत अभिनेते रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख या दांपत्याने श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेतले. महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या श्री तुळजाभवानी देवींची आरती करत त्यांनी पारंपरिक पद्धतीने कुलधर्म व कुलाचार केले. विशेष म्हणजे, महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने रितेश देशमुख दिग्दर्शित आणि जेनेलिया देशमुख निर्मित ‘राजा शिवाजी’ हा छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित असलेला चित्रपट देशभरात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या यशासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी असलेल्या श्री तुळजाभवानी देवींच्या आशीर्वादासाठी त्यांनी देवीच्या चरणी नतमस्तक होत प्रार्थना केली. दरम्यान, आज 1 मे, महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून अभिनेता रितेश देशमुखचा बहुप्रतीक्षित ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच या ऐतिहासिक कलाकृतीबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली होती, ज्याचे प्रतिबिंब आता बॉक्स ऑफिसवरील घवघवीत यशात उमटताना दिसत आहे. हा चित्रपट कमाईचे नवे विक्रम प्रस्थापित करेल अशी चर्चा सिनेवर्तुळात रंगली असली तरी, इतर चित्रपटांशी होणारी स्पर्धा पाहणे रंजक ठरेल. मात्र प्रदर्शनापूर्वीच मिळालेले यश या सिनेमाची भक्कम पकड अधोरेखित करत आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited






