
मुंबईतील गजबजलेल्या भायखळा परिसरात गोळीबाराची खळबळजनक घटना घडली आहे. या हल्ल्यात समीर शेख नावाचा तरुण जखमी झाला असून, भरवस्तीत अचानक झालेल्या गोळीबारामुळे परिसरात मोठी घबराट पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून, जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील भायखळा परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात समीर नावाचा तरुण जखमी झाला असून, त्याच्या पायाला गोळी लागल्याने त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून भायखळा पोलिसांसह गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. हल्लेखोर कोण होते आणि गोळीबारामागचे नेमके कारण काय, याचा शोध घेण्यासाठी पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांची कसून तपासणी करत आहेत. या प्रकारामुळे परिसरात काही काळ भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. डी-कंपनीच्या हस्तकाचा मुलगा जखमी मुंबईतील डोक्यार्ड रोड परिसरात गँगस्टर आणि डी-कंपनीचा हस्तक आसिफ दाढी याचा मुलगा समीर शेख याच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. या हल्ल्यात समीरच्या मांडीला गोळी लागल्याने तो जखमी झाला असून त्याला तातडीने जे.जे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हल्लेखोर घटनास्थळावरून पसार भरवस्तीत गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले असून, भायखळा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपासाची चक्रे फिरवली आहेत. या गोळीबाराचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असले तरी, या घटनेमुळे अंडरवर्ल्डशी संबंधित चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.






