मुलांची विक्री करणाऱ्या आईसह तिघांना चंद्रपुरात अटक: महिलेला 1 जूनपर्यंत पोलिस कोठडी, मुख्य आरोपी अद्याप फरार – Nagpur News

मुलांची विक्री करणाऱ्या आईसह तिघांना चंद्रपुरात अटक:  महिलेला 1 जूनपर्यंत पोलिस कोठडी, मुख्य आरोपी अद्याप फरार – Nagpur News



स्वतःच्या दोन मुलांची विक्री करणाऱ्या आणि अल्पवयीन मुलीच्या नवजात बाळाचा सौदा करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेसह अन्य दोन महिलांना चंद्रपूरच्या रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने मुख्य आरोपी महिलेला १ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून, बाळ खरेदी करणाऱ्या दोन महिलांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. या प्रकरणी ‘अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग’ (मानवी तस्करी) आणि ‘पॉक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, मुख्य आरोपी अजय फुलझेले सध्या फरार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी महिलेच्या पतीच्या निधनानंतर ती अजय फुलझेले याच्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. या काळात अजयने महिलेच्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला, ज्यातून ती गरोदर राहिली. यानंतर आरोपींनी तिची प्रसूती नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये केली. प्रसूतीदरम्यान मुलीचे वय लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र डॉक्टरांना संशय आल्याने त्यांनी नागपूरच्या अजनी पोलिसांना माहिती दिली. अजनी पोलिसांनी ‘झिरो एफआयआर’ नोंदवून हे प्रकरण पुढील तपासासाठी चंद्रपूर पोलिसांकडे वर्ग केले. तपासात मानवी तस्करी उघड रामनगर पोलिस स्टेशनच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी वाकडे यांनी तपास चक्र फिरवत पीडित मुलीचे बयाण नोंदवले. मुलीच्या आईची कसून चौकशी केली असता, तिने यापूर्वी स्वतःच्या अडीच वर्षे आणि ८ महिन्यांच्या अशा दोन मुलांची तेलंगणा व स्थानिक पातळीवर प्रत्येकी दोन लाख रुपयांना विक्री केल्याची कबुली दिली. तसेच, अल्पवयीन मुलीच्या नवजात बाळाचीही विक्री करण्याचा तिचा डाव होता. विक्री केलेल्या दोन्ही बालकांची केली सुटका पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी आईसह, तेलंगणाच्या कागजनगर येथून बाळ खरेदी करणारी एक महिला आणि चंद्रपूरमधील दुसरी महिला अशा तिघींना अटक केली. विक्री करण्यात आलेल्या अडीच वर्षे आणि ८ महिन्यांच्या दोन्ही बालकांची पोलिसांनी सुरक्षित सुटका करून त्यांना अनाथाश्रमात पाठवले आहे. न्यायालयीन प्रक्रियेनंतर पोलिस आता या प्रकरणातील फरार मुख्य आरोपी अजय फुलझेले याचा शोध घेत असून, रामनगर पोलिस पुढील तपास करत आहेत.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp