
भोंदू अशोक खरातच्या अडचणींत वाढ सुरूच असून ईडी आणि सिन्नर पोलिसांच्या तपासानंतर नाशिक शहर पोलिस त्याचा ताबा घेण्याच्या तयारीत आहेत. सरकारवाडा पोलिस ठाण्यात दाखल २ फसवणुकीच्या गुन्ह्यांत त्याचा ताबा मागितला जाणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. दरम्यान, सध्या सिन्नर पोलिस ठाण्यात मिरगाव जमीन फसवणूक प्रकरणाच्या दाखल गुन्ह्यात खरातला मंगळवारी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याने शहर पोलिस त्याला ताब्यात घेण्यासाठी कोर्टात अर्ज करणार आहेत. ताबा मिळवण्यासाठी अर्ज करणार आहेत. त्यानंतर त्याला पुन्हा कायद्याच्या बालेकिल्ल्यात हजर केले जाणार आहे. सिन्नर न्यायालयाचे न्यायाधीश एल. सी. वाडीकर यांनी खरातला न्यायालयीन कोठडी सुनावली. यापूर्वी कुंदेवाडी येथील जगदंबा माता सहकारी पतसंस्थेतील ३२ बनावट खात्यांच्या चौकशीसाठी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. पाच दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर त्याची नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी झाली होती. मात्र, मिरगाव जमीन घोटाळ्याच्या सखोल तपासासाठी सिन्नर पोलिसांनी त्याला कारागृहातून पुन्हा ताब्यात घेतले. या तीन दिवसांच्या पोलिस कोठडीत त्याच्या आर्थिक व्यवहारांचे धागेदोरे, पैशांचा प्रवाह व बनावट कागदपत्रांची कसून चौकशी केली,.पोलिस आता कागदपत्रांची सत्यता पडताळणार आहेत. छायाचित्रकाराला म्हणाला, जमाना गेला तुझा… सिन्नर न्यायालयात हजेरीसाठी आणले असताना वृत्तपत्रांचे छायाचित्रकार खरातचे फोटो टिपत होते. पोलिसांच्या गराड्यात असूनही खरातने त्यांच्याकडे पाहत, जमाना गेला तुझा फोटो काढता काढता, अशी उपरोधिक टिप्पणी केली. फसवणुकीचे गंभीर गुन्हे दाखल असूनही खरातचे हे उद्दाम वर्तन पाहून न्यायालय परिसरात उपस्थित पत्रकार आणि नागरिकांमध्ये संताप आणि उलटसुलट चर्चा सुरू होती. मृत्यूची भीती दाखवत हडपली साडेसोळा एकर जमीन या जमिनीमुळे तुमच्या कुटुंबात मृत्यू होतील, अशी जादूटोण्याची भीती दाखवून खरातने कुंदेवाडीच्या माळी कुटुंबाकडून साडेसोळा एकर जमीन लाटली. त्याने शेतकऱ्यांना केवळ चार लाख रुपये मोबदला दिला.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
