‘माळीण’ दुर्घटना आता मोठ्या पडद्यावर!: ‘एक होतं माळीण’ चित्रपटाचे मोशन पोस्टर लाँच; 24 जुलैला होणार प्रदर्शित

‘माळीण’ दुर्घटना आता मोठ्या पडद्यावर!:  ‘एक होतं माळीण’ चित्रपटाचे मोशन पोस्टर लाँच; 24 जुलैला होणार प्रदर्शित


३० जुलै २०१४… पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण गावावर निसर्गाने असा काही कहर केला की, अवघ्या काही मिनिटांत एक संपूर्ण हसतं-खेळतं गाव ढिगाऱ्याखाली गाडले गेले. या भीषण दुर्घटनेत १५० हून अधिक निरपराध नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या याच काळजाचा थरकाप उडवणाऱ्या दुर्घटनेचा थरार आता ‘एक होतं माळीण’ या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. येत्या २४ जुलै २०२६ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, नुकतेच याचे अधिकृत पोस्टर आणि मोशन पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान (VFX), माळीण गावाचा हुबेहूब आणि भव्य सेट, तसेच दमदार संहिता हे या चित्रपटाचे प्रमुख वैशिष्ट्य असणार आहे. तब्बल १२ वर्षांनंतर ‘तो’ थरार पडद्यावर; प्रत्यक्ष माहितीवर आधारित कथा मुसळधार पावसामुळे डोंगराची दरड कोसळून झालेली ती दुर्घटना केवळ नैसर्गिक आपत्ती नव्हती, तर अनेकांचे संसार उद्ध्वस्त करणारा एक भयानक काळ होता. या चित्रपटाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे, लेखक आणि दिग्दर्शक राजू राणे यांनी स्वतः माळीणमधील वाचलेल्या ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधला. त्यांच्याकडून त्या काळातील अचूक माहिती, भावना आणि दाहकता जाणून घेऊन या चित्रपटाचे कथानक अत्यंत संवेदनशीलतेने विणले गेले आहे. चित्रपटाची तगडी स्टारकास्ट आणि पडद्यामागील टीम ‘ड्रीम डॉट क्रिएशन प्रोडक्शन’च्या संतोष जगन्नाथ म्हात्रे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून, ‘रॅन स्टुडिओज प्रोडक्शन’ने याची प्रस्तुती केली आहे. दत्तात्रय गायकर आणि राजू राणे यांनी या चित्रपटाचे लेखन, संवाद आणि दिग्दर्शन केले आहे. चित्रपटात मराठी सिनेसृष्टीतील अनेक कसलेले कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. उत्कृष्ट व्हीएफएक्स (VFX) आणि संगीताची जोड मराठी चित्रपटसृष्टीत दर्जेदार आणि वास्तववादी कथांवर नेहमीच प्रयोग केले जातात. ‘एक होतं माळीण’ हा चित्रपट त्यामध्ये एक मैलाचा दगड ठरण्याची शक्यता आहे. एका बाजूला गावात राहणाऱ्या माणसांच्या कौटुंबिक आणि हृदयस्पर्शी भावना, तर दुसऱ्या बाजूला निसर्गाचे रौद्ररूप दाखवणारे उत्कृष्ट व्हीएफएक्स आणि संगीत ही या चित्रपटाची मोठी बलस्थाने आहेत.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp