
‘ऑपरेशन टायगर’वर केंद्रीय राज्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते प्रतापराव जाधव यांनी अत्यंत मोठे आणि खळबळजनक विधान केले आहे. ठाकरे गटाचे खासदार फुटत असतील, तर त्याला स्वतः उबाठा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट आणि त्यांचे नेतृत्वच जबाबदार आहे,” असा थेट आरोप प्रतापराव जाधव यांनी केला आहे. ठाकरे गटाच्या खासदारांमध्ये अंतर्गत पातळीवर प्रचंड असंतोष धुमसत असल्याचा दावाही त्यांनी केला. नेत्यांना संशयाच्या नजरेने पाहतात- जाधवांचा घणाघात संजय राऊत यांनी मध्यरात्री केलेल्या 15 कोटींच्या ॲडव्हान्स’च्या आरोपांना उत्तर देताना प्रतापराव जाधव म्हणाले की, मूळ समस्या ही खासदारांबद्दलच्या नेतृत्वाच्या दृष्टिकोनात आहे. तिथल्या लोकप्रतिनिधींना वारंवार संशयाच्या नजरेने पाहिले जाते. कुणाशी बोलायचे, कुणाला भेटायचे आणि कुणाच्या घरी जेवायला जायचे, यावरही पाबंद्या घातल्या जातात. या अशा जाचाला खासदार आता पूर्णपणे कंटाळले आहेत आणि त्यांच्यातील असंतोष कधीही बाहेर पडू शकतो. ‘ऑपरेशन टायगर’ अंतिम टप्प्यात! जाधव यांनी पुढे बोलताना स्पष्ट केले की, ‘ऑपरेशन टायगर’ हे काही बाहेरून लादलेले नाही, तर ते स्वतः ठाकरे गटाच्या अंतर्गत कारभारामुळेच पुढे जात आहे. पक्ष नेतृत्वाकडून वारंवार “ज्यांना राहायचे आहे त्यांनी राहा, ज्यांना जायचे आहे ते जाऊ शकतात” अशा प्रकारची वक्तव्ये केली जातात, ज्यामुळे लोकप्रतिनिधींमध्ये असुरक्षिततेची भावना आहे. शिवसेनेचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या दिवशी मुहूर्त ठरवतील, त्या दिवशी हे ऑपरेशन अधिकृतपणे पूर्ण होईल, असा पुनरुच्चार करत त्यांनी ठाकरे गटाला थेट आव्हान दिले आहे. ठाकरे गटाचे ५ ते ६ खासदार दिल्लीत तळ ठोकून असल्याच्या बातम्यांदरम्यान प्रतापराव जाधव यांच्या या दाव्यामुळे राजकीय वातावरणात आणखी मोठी ठिणगी पडली आहे. उद्धवसेना फुटीच्या उंबरठ्यावर सहा खासदार दिल्लीत दाखल:आज लोकसभा अध्यक्षांना भेटणार, उपमुख्यमंत्री शिंदेही दिल्लीत
महाराष्ट्राच्या राजकारणात 2022 नंतर पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाची चिन्हे आहेत. कारण उद्धवसेनेच्या 9 पैकी 6 खासदारांनी स्वतंत्र गट स्थापनेची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी ते बुधवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांना पत्र देऊ शकतात. त्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी रात्री उशिरा दिल्लीला रवाना झाले. सविस्तर वाचा
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
