
पारोळा तालुक्यातील शेळावे खुर्द गावात मोहरम निमित्त सामाजिक सलोखा आणि बंधुभाव जपत भव्य सरबत वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, यातून गावातील धार्मिक एकोप्याचे दर्शन घडले.मोहरम या पवित्र महिन्याचे औचित्य साधून गावातील मुख्य चौकात सर्वधर्मीय बांधवांसाठी थंडगार सरबत वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजातील नागरिकांनी व तरुणांनी एकत्र येत या उपक्रमाचे नियोजन केले होते. मोहरमच्या निमित्ताने दरवर्षी गावात विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात, याच परंपरेला धरून यंदाही हा स्तुत्य उपक्रम घेण्यात आला.सदर कार्यक्रमात सुरेश शालीक बेलदार यांच्या मार्फत सरबत वाटप करण्यात आले. या प्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक, ग्रामस्थ आणि तरुण मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रस्त्यावरून जाणाऱ्या-येणाऱ्या प्रवाशांना आणि नागरिकांना सरबत वाटप करून सर्वांचे स्वागत करण्यात आले. गावातील या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.या उपक्रमाप्रसंगी माजी सरपंच राजेंद्र पाटील, दुर्योधन बेलदार, शफी खाटीक, युनूस खाटीक, इरफान खाटीक, प्रकाश पाटील, वसिम खाटीक, दिपक गिते, बाबूलाल बेलदार, अर्जुन बेलदार यांच्यासह गावातील नागरिक आणि तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
