दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह‎: ‘शुद्ध हवे’चा प्रथम पुरस्कार, 50 ई-बसेसही तयार, पण चार्जिंग स्टेशनचे काम संथगतीने – Amravati News

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह‎:  ‘शुद्ध हवे’चा प्रथम पुरस्कार, 50 ई-बसेसही तयार, पण चार्जिंग स्टेशनचे काम संथगतीने – Amravati News



शहराची हवा शुद्ध राहावी, प्रदूषण कमी व्हावे या उद्देशाने केंद्र सरकारने अमरावती महानगर पालिकेला ५० इलेक्ट्रिक सिटी बस दिल्या असल्या तरी ई-बसमधून प्रवास करण्यासाठी शहरवासीयांना आणखी किमान सव्वा ते दीड वर्ष प्रतिक्षा करावी लागणार आहे. कारण,आता कुठे कोंडेश्वर मार्गावरील जकात नाका व फिशरीज हब लगत असलेल्या चार्जिंग स्टेशनसह इलेक्ट्रिक बस डेपोचे काम सुरू झाले आहे. सुरक्षा भिंत उभारण्यात आली असून जनरेटर आले आहेत. मात्र, चार्जिंग स्टेशनच उभे झाले नाही. शासनाकडून ५.८८ एकर जागा कोंडेश्वर येथे मिळाली त्याला आता किमान एक वर्ष झाले आहे. तरीही अद्याप ई-सिटी बस चार्जिंग स्टेशन व डेपोच्या कामाने वेग घेतला नसल्याचे दिसून येत आहे. कधी विद्युत पुरवठा खंडित झाला तर बॅकपसाठी जनरेटर्स येऊन पडले आहेत. येथे एका वेळी ८ बसेसचे चार्जिंग करता येणार असून यासाठी ४ तास लागतील. एका चार्जिंग स्टेशनची क्षमता ही २४० किलोव्हॅट असून एकूण ९४० किलो व्हॅटचे क्षमतेचे सब-स्टेशन उभारण्यात आले आहे. मात्र, अद्याप बांधकाम पूर्ण झाले नसून ते प्राथमिक स्थितीत आहे. मनपाला केंद्र सरकारकडून ५० ई-बसेस मिळणार असून यात ४० बसेस या ९ मी. लांबीच्या असून त्यात ३८ आसने असतील. शहरात सध्या सुरू असलेल्या इंधनावर चालणाऱ्या सिटी बसेसची एकूणच स्थिती बघता त्या फारवेळ तग धरणार नाहीत, अशी स्थिती आहे. कारण, त्यांची सतत दुरुस्ती करून त्या रस्त्यावर चालवल्या जात आहेत. त्यामुळे ई-सिटी बसेस सुरू करण्याशिवाय मनपाकडे अन्य पर्याय नसला तरी कामातील संथपणा बघून याबाबत मनपा प्रशासन फारसे गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. ई-बस सुरू होण्यास डिसेंबरपर्यंत वेळ ^शहरात ई-बस सुरू होण्यास डिसेंबर २०२६ पर्यंतचा वेळ लागू शकतो. आता चार्जिंग स्टेशनचे काम सुरू झाले असून येत्या काही दिवसांत कामाला वेग येईल. केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या ५० सिटी बसच्या देखभाल, दुरुस्तीची व्यवस्था येथे केली जाईल. यासाठी ७ ते ८ कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. – राजेश अडोकार , वाहतूक व्यवस्थापक, मनपा. कार्यशाळेचे दोन स्वतंत्र विभाग केले तयार इलेक्ट्रिक सिटी बस चार्जिंग स्टेशन, डेपो आणि एकूणच व्यवस्थापन व्यवस्थितपणे सांभाळता यावे, यासाठी स्वप्निल जसवंते यांच्याकडे कार्यशाळेची जबाबदारी देण्यात आली असून वाहतूक व्यवस्थापक (ट्रान्सपोर्ट मॅनेजर) म्हणून राजेश अडोकार यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. आधी जागा मिळत नव्हती, आता कामात नाही वेग नसल्याची खंत महानगर पालिकेला इलेक्ट्रिक बसच्या चार्जिंग स्टेशनसाठी आधी जागा मिळत नव्हती. सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर कोंडेश्वर येथे शासनाने ५.८८ एकर जागा दिली. जागा मिळाली मात्र, अद्याप कामाने वेग घेतला नसल्यामुळे किमान आणखी सव्वा ते दीड वर्ष शहरवासीयांना आनंद उपभोगता येणार नाही. पुरस्कार मिळाल्यानंतर केंद्राने ई-बस शहरासाठी मंजूर केल्या तीन वर्षांआधी अमरावती शहराने ६ लाखावरील लोकसंख्येच्या शहरात देशात शुद्ध हवेसाठी प्रथम पुरस्कार पटकावला. त्यामुळे केंद्र शासनाने शहरातील हवेत प्रदूषण कमी व्हावे या अनुषंगाने तत्काळ ५० इलेक्ट्रिक सिटी बस मंजूर केल्या. डेपो उभा राहिला की, तत्काळ त्या कंपनीकडून मनपाच्या डेपोवर येतील.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp