
सद्गुरु श्री संत शेख महंमद महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील रथाच्या बैलांसाठी गंगापूर तालुक्यातील भिवधानोरा येथील बाबासाहेब डुबे, प्रसाद नवथर, पंडित चव्हाण, विश्वास महाडिक आणि विवेक महाडिक यांनी पारंपरिक ‘जू’ अर्पण करून भक्तीभावाची अनोखी परंपरा जपली आ
.
महाराष्ट्रात केवळ तीन संतांच्या पालखी रथांना अशा प्रकारे ‘जू’ अर्पण करण्याचा मान असून, त्यामध्ये श्री संत शेख महंमद महाराज पालखी सोहळ्याचा समावेश आहे. बाबासाहेब डुबे आणि प्रसाद नवथर हे गेल्या अनेक वर्षांपासून आळंदीच्या संत ज्ञानेश्वर माउलींच्या तसेच देहूच्या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी रथासाठी ‘जू’ अर्पण करण्याचे पवित्र कार्य करत आहेत. श्री संत शेख महंमद महाराजांचा पालखी सोहळा सुरू झाल्याची माहिती मिळताच ते स्वतः श्रीगोंदा येथे दाखल झाले व पालखी रथासाठी ‘जू’ अर्पण करून परंपरेला उजाळा दिला. चार वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या पालखी सोहळ्यात त्यांच्या योगदानामुळे पालखी रथाची शोभा आणि भक्तीभाव अधिक वृद्धिंगत झाला आहे.
यावेळी ग्रामस्थांच्या वतीने बाबासाहेब डुबे, प्रसाद नवथर, पंडित चव्हाण, विश्वास महाडिक आणि विवेक महाडिक यांचा सत्कार करण्यात आला. यात्रा समितीचे अध्यक्ष गोपाळराव मोटे, आघाव भाऊसाहेब, सुदाम तात्या झुंजुरुक, अरविंद कापसे, मेहेत्रे भाऊसाहेब, शहाजी पांढरकर, मयूर पाटील, भोजराज मोटे पाटील, अमोल पवार आदी मान्यवर उपस्थित होते. पालखी सोहळ्यातील बैलजोडीचे मानकरी संदीप बोदगे यांच्या माध्यमातून हा पवित्र योग जुळून आल्याचे सांगण्यात आले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
