मोबाइल हॅक करून सायबर 4 लाख केले लंपास: खराडी पोलिसांकडून सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल – Pune News

मोबाइल हॅक करून सायबर 4 लाख केले लंपास:  खराडी पोलिसांकडून सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल – Pune News



पुण्यात एका तरुणाचा मोबाइल क्रमांक हॅक करून सायबर चोरट्यांनी त्याच्या बँक खात्यातून ३ लाख ९२ हजार रुपये काढून घेतले आहेत. या प्रकरणी खराडी पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत खराडी भागात राहणाऱ्या एका ३३ वर्षीय तरुणाने खराडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी सुरुवातीला तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तरुणाचा मोबाइल क्रमांक बँक खात्याला जोडलेला होता. त्यानंतर चोरट्यांनी तरुणाच्या मोबाइल क्रमांकाचा तांत्रिक ताबा (हॅक) घेतला. मोबाइल क्रमांक हॅक केल्यानंतर चोरट्यांनी तरुणाच्या बँक खात्यातून ३ लाख ९२ हजार रुपयांची रोकड दुसऱ्या एका खात्यात हस्तांतरित केली. ही बाब लक्षात आल्यानंतर तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली.गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक चंद्रसेन पालकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. डॉक्टरांकडे ५० हजारांची खंडणी; रुग्णालयाबाहेर दहशत येरवडा भागात एकाने ७५ वर्षीय डॉक्टरला धमकावून ५० हजार रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला. आरोपीने तीक्ष्ण शस्त्र उगाररुन रुग्णालयाच्या परिसरात दहशत माजविली. या प्रकरणी अमोल पिल्ले (वय ४५, रा. जयजवाननगर, येरवडा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका डॉक्टरांनी लक्ष्मीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ७५ वर्षीय डॉक्टरांचा येरवड्यातील जयजवाननगर भागात खासगी दवाखाना आहे. ते येरवडा भागातील महाराष्ट्र हौसिंग बोर्ड परिसरात राहायला आहेत. आरोपी याने डॉक्टरांना तीक्ष्ण शस्त्राचा धाक दाखविला. त्यांच्याकडे ५० हजार रुपयांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली, असे डॉक्टरांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. खंडणीसाठी डॉक्टरांना धमकाविण्यात आल्यानंतर आरोपी रुग्णालयातून बाहेर पडला. त्याने रस्त्यावर येऊन शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आरोपीने शस्त्र उगारून रस्त्यावर दहशत माजविली. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र कदम यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपीविरुद्ध खंडणी मागणे, बेकायदा शस्त्र बाळगणे, तसेच महाराष्ट्र पोलिस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पसार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp