शेतकऱ्यांना मोठा दिलासा ते ST बसस्थानकांचा कायापालट: फडणवीस सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत 8 महत्त्वाचे निर्णय – Mumbai News

शेतकऱ्यांना मोठा दिलासा ते ST बसस्थानकांचा कायापालट:  फडणवीस सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत 8 महत्त्वाचे निर्णय – Mumbai News

राज्यातील शेतकरी, पायाभूत सुविधा आणि शहरी विकासाला मोठी गती देण्यासाठी राज्य सरकारने आज महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 14 जुलै रोजी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 8 अत्यंत महत्त्वाचे आणि रा

.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत 8 महत्त्वाचे निर्णय

  1. आंतरराष्ट्रीय दर्जाची कृषी बाजारपेठ: पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील मौजे दापचरी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार उभारला जाणार आहे. यासाठी दुग्ध प्रकल्पाची 558.43 हेक्टर जमीन महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाला देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे पालघर आणि ठाणे परिसरातील शेतकऱ्यांना जागतिक दर्जाच्या पणन सुविधा उपलब्ध होतील.
  2. शेतकऱ्यांना पीक कर्जात मोठा दिलासा: ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना- 2026’ च्या निकषांमध्ये मोठी सुधारणा करण्यात आली आहे. 2029 च्या कर्जमाफी योजनेतील सुमारे 13 लाख शेतकऱ्यांसाठी असलेली 50 हजार रुपयांची मर्यादा रद्द करून त्यांना नियमित कर्जमाफी दिली जाईल. तसेच, 2026-27 मधील नियमित परतफेडीची अट रद्द केल्यामुळे राज्यातील तब्बल 23 लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे.
  3. स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मुद्रीकरण धोरण: राज्यातील महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींना उत्पन्नाचे नवे मार्ग शोधता यावेत, यासाठी मालमत्तांसाठी ‘मुद्रीकरण (Monetization) धोरण’ मंजूर करण्यात आले आहे.
  4. अर्बन चॅलेंज फंड: शहरांमध्ये दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी राज्यात केंद्र शासन पुरस्कृत ‘अर्बन चॅलेंज फंड अभियान’ राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  5. बीड क्रीडा संकुलाला निधी: बीड जिल्हा क्रीडा संकुलाच्या आधुनिकीकरणासाठी 24.95 कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. यात सिंथेटिक ॲथलेटिक ट्रॅक, विविध खेळांची मैदाने आणि वसतिगृहाचा समावेश आहे.
  6. निर्दोष बंद्यांसाठीच्या अनुदानात दुप्पट वाढ: अपराधी परिविक्षा अधिनियम 1958 अंतर्गत, निर्दोष सुटलेल्या आणि परिविक्षाधीन कैद्यांना देण्यात येणारे सहायक अनुदान 25 हजार रुपयांवरून थेट 50 हजार रुपये इतके करण्यात आले आहे.
  7. एसटी बसस्थानकांचा पीपीपी तत्त्वावर विकास: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (ST) राज्यभरातील जिल्हा, तालुका आणि ग्रामीण भागातील अतिरिक्त जागांचा आणि बसस्थानकांचा पीपीपी (PPP) तत्त्वावर विकास करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
  8. गौण खनिज उत्खनन नियमात बदल: महसूल व वन विभागाच्या अखत्यारीतील ‘महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन (विकास व विनियमन) नियम 2013’ मध्ये सुधारणा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

मंत्रिमंडळाच्या या निर्णयांनंतर आता संबंधित विभागांकडून तातडीने शासन निर्णय (GR) जारी केले जातील. दापचरी येथील कृषी बाजारपेठेचा आराखडा तयार करून निविदा प्रक्रिया राबवली जाईल. तसेच, राज्यातील एसटी बसस्थानकांचा व्यावसायिक आणि प्रवासी सुविधांच्या दृष्टीने विकास करण्यासाठी खासगी कंपन्यांसोबत भागीदारी (PPP) करण्याच्या प्रक्रियेला गती दिली जाईल. कर्जमाफीच्या निकष बदलामुळे पात्र शेतकऱ्यांच्या याद्या अद्ययावत करून त्यांच्या खात्यात थेट लाभ जमा करण्याची प्रक्रिया सुरू होईल.

या 8 धडाकेबाज निर्णयांमुळे राज्याच्या ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही अर्थव्यवस्थांना मोठी चालना मिळणार आहे. 50 हजार रुपयांची मर्यादा आणि नियमित परतफेडीची अट रद्द केल्याने राज्यातील एकूण 36 लाख (13 लाख + 23 लाख) शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी फुटणार आहे. एसटीच्या जागांच्या विकासामुळे प्रवाशांना आधुनिक सुविधा मिळतील आणि एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढेल. तसेच, स्थानिक स्वराज्य संस्थांना स्वतःच्या मालमत्तांतून उत्पन्न मिळवण्याचा मार्ग मोकळा झाल्याने शहरांचा विकास वेगाने होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा…

‘राहुल गांधींना चुकीचे ब्रीफिंग मिळते’:चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार, दुबार पेरणीसाठी मोठ्या मदतीची घोषणाही केली

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देताना, “राहुल गांधींना महाराष्ट्राबाबत योग्य माहिती दिली जात नाही. त्यांना चुकीचे ब्रीफिंग मिळत आहे,” असा दावा केला. याचवेळी त्यांनी राज्य सरकारने पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंतची सर्वात कठोर कारवाई केल्याचे सांगत, दोषींना पुन्हा अशी हिंमत होणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. पत्रकार परिषदेत बोलताना बावनकुळे यांनी दुबार पेरणी, बोगस बियाणे, भेसळयुक्त दूध, ‘ऑपरेशन टायगर’, अनधिकृत झाडांच्या दुर्घटना आणि राष्ट्रवादी काँग्रेसबाबतच्या चर्चांवरही भूमिका मांडली. येथे वाचा संपूर्ण बातमी

थेट राम मंदिरावर दरोडा, संघाची नाराजी हास्यास्पद:हर्षवर्धन सपकाळांचा भाजप-आरएसएसवर हल्लाबोल; ‘गँग ऑफ ट्रिपल इंजिन’ सरकार म्हणत केले लक्ष्य

शेतकऱ्यांना मोठा दिलासा ते ST बसस्थानकांचा कायापालट: फडणवीस सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत 8 महत्त्वाचे निर्णय - Mumbai News

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राम मंदिर ट्रस्टमधील कथित आर्थिक गैरव्यवहार, राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिती, शेतकरी प्रश्न, महायुती सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडींवरून राज्य सरकार तसेच भाजपवर जोरदार टीका केली. “राम मंदिरावर थेट दरोडा पडला आहे. केवळ नाराजी व्यक्त करून काही होणार नाही,” असे म्हणत त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थेट लक्ष्य केले. मराठवाड्यातील काँग्रेसच्या संघटनात्मक आढावा बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विविध राजकीय आणि सामाजिक विषयांवर भूमिका मांडली. येथे वाचा संपूर्ण बातमी

तुम लढो, हम कपडा संभालते…:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; रामरक्षा आंदोलनाची उडवली खिल्ली

शेतकऱ्यांना मोठा दिलासा ते ST बसस्थानकांचा कायापालट: फडणवीस सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत 8 महत्त्वाचे निर्णय - Mumbai News

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत सडकून टीका केली आहे. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला ठाकरे गटाने दिलेल्या पाठिंब्यावरून आणि राज्यात सुरू केलेल्या ‘रामरक्षा’ आंदोलनावरून एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. विरोधक देशात केवळ अराजकता पसरवण्याचे काम करत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)