
साकळी येथील शारदा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात पालक-शिक्षक सभा पार पडली. विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यात सुसंवाद निर्माण करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी परस्पर सहकार्य वाढवणे, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी पालकांचा सक्रिय सहभाग मिळवणे हा या सभेचा मुख्य उद्देश होता. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक आर. जे. महाजन, तर व्यासपीठावर पर्यवेक्षक एस. जे. पवार, संस्थेचे संचालक श्यामकांत वसंतराव महाजन, शिक्षक प्रतिनिधी संचालक बी. ई. महाजन, जी. एल. चौधरी, शिक्षक आर. सी. जगताप, के. पी. गोरे व एन. आर. सपकाळे उपस्थित होते. प्रास्ताविकात पर्यवेक्षक एस. जे. पवार यांनी केले. सभेत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी माता-पिता पालक संघाची नवीन कार्यकारिणी एकमताने निवडण्यात आली. यात अध्यक्षपदी मुख्याध्यापक आर. जे. महाजन, पिता उपाध्यक्षपदी उमेश रमेश बडगुजर, माता उपाध्यक्षापदी रेखा किरण माळी, सचिव एम. ए. महाजन, पिता सहसचिव प्रमोद गौतम सोनवणे आणि माता सहसचिवपदी भारती प्रवीण जैन यांची निवड झाली. पालकांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन करण्यात आले. सूत्रसंचालन के. पी. गोरे तर आभार एन. आर. सपकाळे यांनी मानले. सभेत झालेले महत्त्वाचे निर्णय व मार्गदर्शन शाळेत विद्यार्थ्यांनी नियमित उपस्थित राहणे, गृहपाठ व लेखी काम वेळेत पूर्ण करणे आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शालेय बस व रिक्षा वाहतुकीचे योग्य व्यवस्थापन करणे यावर सभेत निर्णय घेण्यात आले. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पालक, शिक्षक व संस्था यांचे परस्पर सहकार्य हीच यशाची गुरुकिल्ली असून विद्यार्थ्यांनी स्वअनुशासन आणि वेळेच्या नियोजनाला प्राधान्य द्यावे, असे मार्गदर्शन सभेत करण्यात आले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.