कदमापूर जि.प. शाळेत 5 मिनिटांत 40 पालकांपर्यंत थेट शिक्षण संवाद: शिक्षक राजेश कोगदे यांची संकल्पना; शालेय प्रगतीचे ‘ड्रीप इरीगेशन’‎ – Chhatrapati Sambhajinagar News

कदमापूर जि.प. शाळेत 5 मिनिटांत 40 पालकांपर्यंत थेट शिक्षण संवाद:  शिक्षक राजेश कोगदे यांची संकल्पना; शालेय प्रगतीचे ‘ड्रीप इरीगेशन’‎ – Chhatrapati Sambhajinagar News


आधुनिक तंत्रज्ञानाचा परिणामकारक वापर करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे नियमित निरीक्षण कसे करता येऊ शकते, याचा आदर्श प्रयोग कदमापूर येथील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षक राजेश कोगदे यांनी साकारला आहे. ‘ड्रीप इरीगेशन’ अर्थात ठिब

.

शेतीमध्ये कमी पाण्यात प्रत्येक रोपापर्यंत समान प्रमाणात पाणी पोहोचवून त्याची वाढ सक्षम केली जाते. याच धर्तीवर शिक्षक कोगदे यांनी प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रगतीची माहिती थेट पालकांपर्यंत पोहोचवण्याची ‘शैक्षणिक ठिबक सिंचन’ पद्धत सुरू केली आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यातील दैनंदिन संवाद अधिक मजबूत झाला असून शिक्षण प्रक्रियेत सातत्य निर्माण झाले आहे.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती वाढण्यास मदत होत आहे. तर विद्यार्थी शाळेत उशिरा येणे, शाळेतून लवकर घरी जाणे, शाळेत अनुपस्थिती आहे काय यासह दैनंदिन अभ्यासातील सकारात्मक सुधारणा आवश्यक असलेल्या बाबी निदर्शनास येतात.

विशेषतः भाषा, गणित आणि इंग्रजी या विषयांतील मूलभूत संकल्पना अधिक मजबूत करण्यावर भर दिला जातो. विद्यार्थ्यांना कोणत्या घटकात अडचण आहे, कोणत्या बाबीत प्रगती झाली आहे आणि पुढील दिवशी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायचे आहे, याची माहिती पालकांना थेट पाठविली जाते. पूर्वी अनेक पालकांना आपल्या मुलाची दैनंदिन प्रगती समजत नव्हती. आता मात्र संदेश मिळाल्यानंतर पालक घरीच मुलांशी चर्चा करतात, गृहपाठ तपासता येतो.

या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे अवघ्या पाच मिनिटांत जवळपास ४० पालकांपर्यंत विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा अहवाल पोहोचविला जातो. मोबाईल तंत्रज्ञान आणि डिजिटल संदेश प्रणालीचा वापर करून शिक्षक कोगदे दररोज पालकांशी संपर्क साधतात. त्यामुळे पालकांना शाळेत येण्याची वाट पाहावी लागत नाही; तर विद्यार्थ्यांच्या शिकण्याची स्थिती त्यांना त्याच दिवशी त्यांच्या मोबाईलवर कळते.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »