
राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला. 21 जुलै सकाळी 8.30 वाजता झालेल्या नोंदीनुसार गेल्या 24 तासांत 12.2 मिमी पाऊस झाला. विदर्भ, मध्य महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावली असली तरी छत्रपती संभाजीनगरसह मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम धारा कोसळल्या. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला. या वर्षीच्या पावसाळ्यात 21 जुलैपर्यंत राज्यात 380.2 मिमी पाऊस झाला आहे. या कालावधीत सरासरी 431.8 मिमी पाऊस अपेक्षित असतो. हे लक्षात घेता आतापर्यंत 88.1 टक्के पाऊस झाला असून सध्या 11.9 टक्क्यांची तूट पडलेली आहे. परिणामी धरणांमधील साठा फारसा वाढलेला नाही. दरम्यान, बुधवारी मुंबईसह संपूर्ण कोकण, गोवा तसेच नाशिक, सातारा आणि कोल्हापूर घाट परिसरात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर पुणे घाट परिसरात रेड अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे मान्सून सक्रिय
मध्य प्रदेश, हरियाणा, राजस्थान, आंध्र किनारपट्टी तसेच उत्तर छत्तीसगड लगतच्या भागावर हवेची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. याशिवाय आंध्र किनारपट्टी ते अरबी समुद्रादरम्यान हवेचा दाब कायम आहे. यामुळे देशभर मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. नाशिक : साठ्यात वाढ
नाशिक । नाशिक जिल्ह्यात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने 21 जुलैपर्यंत सरासरीपेक्षा 28 टक्के अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे गंगापूर, दारणा आणि वालदेवी धरणातील पाणीसाठा हा गतवर्षीपेक्षा अधिक असल्याचे दिसून येत आहे. 25 जुलैपर्यंत पाऊस
आषाढी एकादशी म्हणजे 25 जुलैपर्यंत पाऊस राहील. त्याचा जोर 22-23 जुलैला वाढणार आहे. त्यानंतर मान्सून वारे कमकुवत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील 5 दिवस पावसाचा जोर कमी होईल. -माणिकराव खुळे, हवामानतज्ज्ञ धरणांची स्थिती जायकवाडी 31.07%
माजलगाव 16.41%
निम्न दुधना 23.37%
मांजरा 16.01%
येलदरी 52.03%
गंगापूर 74.35%
दारणा 66.13%
भंडारदरा 66.43%
निळवंडे 35.40%
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
https://doonitednews.in/advertisement-rate-card/