5 महिन्यांपासून नवे गॅस कनेक्शन बंद: 52 हजार ग्राहक ‘वेटिंग’वर, दुसऱ्या सिलिंडरसाठी 35 हजार अर्ज दाखल – Chhatrapati Sambhajinagar News

5 महिन्यांपासून नवे गॅस कनेक्शन बंद:  52 हजार ग्राहक ‘वेटिंग’वर, दुसऱ्या सिलिंडरसाठी 35 हजार अर्ज दाखल – Chhatrapati Sambhajinagar News



गॅसटंचाईचे कारण पुढे करत शासनाने मार्च 2026 पासून नवीन घरगुती वापराच्या गॅसचे (एलपीजी) कनेक्शन देण्यावर अघोषित बंदी घातली. परिस्थिती पूर्वपदावर येऊनही ही बंदी कायम असल्याने, सर्वसामान्यांसह नोकरी-उद्योगासाठी शहरात आलेल्या स्थलांतरित नागरिक आणि कामगारांचे हाल होत आहेत. तब्बल 52 हजार नागरिक नवीन कनेक्शन घेण्यासाठी वेटिंगवर असून दुसऱ्या सिलिंडरसाठीदेखील सुमारे 35 हजार कनेक्शनधारकांनी मागणी केल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली. दरम्यान, पुढील महिन्यात केंद्र सरकारच्या सूचनांनंतर नवे कनेक्शन देणे सुरू होऊ शकते, अशी माहिती गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली. छत्रपती संभाजीनगर शहरात 29 गॅस एजन्सी आहेत. जिल्ह्यातील एजन्सींची संख्या 74 आहे. सर्व एजन्सींवर दरमहा साधारण 9 ते 10 हजार नवीन कनेक्शनची मागणी असते. मात्र, गेल्या 5 महिन्यांपासून नवीन जोडण्यांची प्रक्रिया पूर्णपणे बंद असल्याने 52 हजार ग्राहकांचे अर्ज प्रलंबित आहेत. शहरामध्ये एकदा सिलिंडर घेतल्यानंतर दुसरे सिलिंडर घेण्यासाठी 25 दिवसांचा वेटिंग पीरियड आहे, तर ग्रामीण भागामध्ये हाच कालावधी 45 दिवसांचा आहे. याचा फटका शहरालगत असलेल्या वाळूज एमआयडीसी, शेंद्रा एमआयडीसी आणि सातारा-देवळाई परिसरातील 2 लाखांपेक्षा अधिक कनेक्शनधारकांना बसत आहे. हे नागरिक शहरात असूनदेखील यांच्या एजन्सी जुन्या गावात असल्याने त्यांना 45 दिवस सिलिंडरसाठी वाट पाहावी लागत आहे. केंद्र सरकारच्या सूचनांची कंपन्या, एजन्सींना प्रतीक्षा नवे गॅस कनेक्शन सुरू करण्यासाठी पुरवठा विभाग आणि गॅस कंपन्यांनी पेट्रोलियम मंत्रालयाकडे पत्रव्यवहार केला आहे. केंद्राच्या सूचनांची त्यांनी प्रतीक्षा आहे. पुढील महिन्यात नवे गॅस कनेक्शन देण्याबाबत निर्देश प्राप्त होतील, असे गॅस कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या निर्देशांकडे गॅस कंपन्या व एजन्सींचे लक्ष लागले आहे. शहरात नोकरीच्या निमित्ताने येणाऱ्या कामगार, कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे नव्या कनेक्शनची मागणी करणाऱ्यांची संख्या जास्त असल्याचे सूत्रांनी सांगितले. गॅस तुटवडा निर्माण झाल्यानंतर दुसऱ्या सिलिंडरला मागणी आखाती युद्धामुळे घरगुती गॅसचा पुरवठा विस्कळीत झाला. सिलिंडर घेण्यासाठी ग्राहकांना गॅस एजन्सीवर चकरा माराव्या लागल्या. गॅसअभावी मनस्ताप सोसल्यामुळे संकटाच्या काळात घरी अतिरिक्त सिलिंडर असावे, असा विचार बहुतांश ग्राहकांनी केला आहे. त्यामुळे सुमारे 35 हजार ग्राहकांनी दुसऱ्या सिलिंडरसाठी मागणी केली आहे. महिन्याला 300 पेक्षा अधिक नवीन कनेक्शनच्या मागणीसाठी अर्ज महिन्याला 250 ते 300 नागरिकांकडून नवीन कनेक्शनसाठी मागणी येते. कंपनीकडूनच नवीन कनेक्शन देणे बंद असल्याने आम्ही देऊ शकत नाही. जिल्ह्यात सर्व एजन्सी मिळून दररोज 300 ते 400 नवीन गॅस मागणी येते. नागरिकांनी ई-केवायसी करून घ्यावे. त्यामुळे त्यांच्या कनेक्शनला अडचण येणार नाही. – मनोज कासलीवाल, गॅस एजन्सी मालक
शहरात एलपीजीचा पुरवठा सुरळीत झाला आहे. प्रवीण फुलारी, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रश्न : नवीन कनेक्शन देणे का बंद आहे, कधी सुरू होईल?
उत्तर : कंपन्यांनी कनेक्शन देणे बंद केलेले आहे, सुरू करण्यासाठी आम्ही पत्रव्यवहार केला आहे.
प्रश्न : शहरालगतच्या अनेक एजन्सीना वेटिंग पीरियड 45 दिवसांचा का आहे ?
उत्तर : काही एजन्सींचे रजिस्ट्रेशन जुन्या ग्रामीण भागातील असल्याने ते आजही ग्रामीण भागातच गृहीत धरले जाते. याबाबत कंपन्यांशी चर्चा केली असून त्यांनी एजन्सीला आवश्यक त्या सूचना केल्या आहेत.
प्रश्न : काही एजन्सीधारक ब्लॅकमध्ये सिलिंडर विक्री करत आहेत, त्यांच्यावर कारवाई का करत नाही ?
उत्तर : आमच्या पथकाकडून नियमित तपासणी सुरू आहे. ब्लॅकमध्ये विकणारे आढळल्यास आम्ही त्यांच्यावर कारवाई केली असून गुन्हेदेखील दाखल केले आहेत.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

https://doonitednews.in/advertisement-rate-card/

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »