NEET पेपरफुटीवरून महाराष्ट्रात काँग्रेस आक्रमक: नागपूर-पुण्यात आंदोलन, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड – Pune News

NEET पेपरफुटीवरून महाराष्ट्रात काँग्रेस आक्रमक:  नागपूर-पुण्यात आंदोलन, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड – Pune News

‘नीट’ (NEET) पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने केंद्र सरकारविरोधात आंदोलनाची धार आणखी तीव्र केली आहे. दिल्लीतील राहुल गांधी यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत मंगळवारी महाराष्ट्रातील नागपूर आणि पुणे येथे काँग्रेस आणि युवक काँग्रेसच्या वतीने जोरदार निदर्शने

.

दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केल्यानंतर त्याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले. नागपूर आणि पुण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध नोंदवला.

नागपुरात आंदोलन, पोलिसांची कारवाई

नागपुरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. आंदोलकांनी बॅरिकेड्स ओलांडण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत त्यांची धरपकड सुरू केली. अनेक आंदोलकांना पोलिसांच्या वाहनातून घटनास्थळावरून हटविण्यात आले. आंदोलनादरम्यान केंद्र सरकारविरोधात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. पंतप्रधान मोदींचा राजीनामा होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. संसदेत विरोधकांनी काळे कपडे परिधान करून केलेल्या निषेधाचाही उल्लेख करत सरकार विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला.

पुण्यात मोहोळ यांच्या कार्यालयाबाहेर भरपावसात ठिय्या

पुण्यात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या मुख्य कार्यालयाबाहेर भरपावसात ठिय्या आंदोलन केले. मोठ्या संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांनी “नीट घोटाळ्याची चौकशी करा”, “विद्यार्थ्यांना न्याय द्या”, “धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा” अशा घोषणा देत केंद्र सरकारचा निषेध केला.

मुसळधार पावसाची पर्वा न करता आंदोलन सुरूच ठेवल्याने कार्यालय परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. मात्र आंदोलन सुरूच राहिल्याने प्रमुख कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले.

“विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू राहील”

आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी, विद्यार्थ्यांना न्याय द्यावा आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले आहे. काँग्रेसने इशारा दिला आहे की, विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत आणि या प्रकरणात जबाबदारांवर कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे. दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत सुरू असलेल्या या आंदोलनामुळे ‘नीट’ पेपरफुटीचा मुद्दा आता अधिकच तापला असून, त्याचे राजकीय पडसाद देशभर उमटताना दिसत आहेत. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पुणे पोलिसांनी आंदोलकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलन सुरूच राहिल्याने प्रमुख कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. कार्यालय परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितले की, दिल्लीतील जंतर-मंतर आणि संसद परिसरात विद्यार्थी आंदोलकांशी झालेल्या वागणुकीच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत आणि ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशाराही देण्यात आला. दरम्यान, संसदेच्या पावसाळी अधिवेशनातही या मुद्द्यावर गदारोळ सुरू राहिला. विरोधी पक्षाच्या खासदारांनी काळे कपडे परिधान करून संसद परिसरात निदर्शने केली. लोकसभेतील कामकाज सुरू होताच गोंधळ झाल्याने सभागृहाचे कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.

हेही वाचा..

जंतरमंतरवर सलग तिसऱ्या रात्री हजारो आंदोलक:CJP च्या कार्यकर्त्यांची सुटका; दावा- मंत्री नड्डा, जितेंद्र सिंह वांगचुक यांना भेटले

दिल्लीतील जंतर-मंतर येथे ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) आंदोलनाचा आज ३३ वा दिवस आहे. मंगळवारी रात्री हजारो आंदोलक या ठिकाणी ठाण मांडून बसले होते; त्यांची तिथे ही सलग तिसरी रात्र होती. यामध्ये अशा व्यक्तींचाही समावेश होता ज्यांना २० जुलै रोजी झालेल्या ‘संसद मोर्चा’दरम्यान पोलिसांच्या लाठीमाराचा आणि अश्रूधुराच्या नळकांड्यांचा सामना करावा लागला होता. सविस्तर वाचा

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

https://doonitednews.in/advertisement-rate-card/

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »