तुमचा पैसा सुरक्षित आहे का?: टेक्स्ट मेसेजद्वारे होणाऱ्या सायबर फसवणुकीत 146 टक्क्यांची प्रचंड वाढ; भारतीय बँकिंग क्षेत्रासमोर गंभीर आव्हान – Mumbai News

तुमचा पैसा सुरक्षित आहे का?:  टेक्स्ट मेसेजद्वारे होणाऱ्या सायबर फसवणुकीत 146 टक्क्यांची प्रचंड वाढ; भारतीय बँकिंग क्षेत्रासमोर गंभीर आव्हान – Mumbai News



भारतात मोबाईलद्वारे सर्वसामान्य नागरिकांची होणारी आर्थिक फसवणूक चिंतेचा विषय ठरत आहे. ‘बायोकॅच’ (BioCatch) या मानवी वर्तनाचे विश्लेषण करणाऱ्या कंपनीच्या नवीन अहवालानुसार, वर्ष 2025 च्या दुसऱ्या सहामाहीपासून ते वर्ष 2026 च्या पहिल्या सहामाहीदरम्यान डिजिटल बँकिंग क्षेत्रातील टेक्स्ट मेसेज (SMS) आधारित फसवणुकीमध्ये आधीच्या वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत तब्बल 146 टक्क्यांनी वाढ झाली आहे. संगणकांपेक्षा मोबाईलवर सायबर गुन्हेगारांचा डोळा अहवालानुसार, मोबाईलद्वारे होणाऱ्या एकूण आर्थिक फसवणुकीच्या प्रमाणात 67 टक्क्यांची वाढ झाली आहे. यामध्ये आयफोन (iOS) उपकरणांवर फसवणुकीचे प्रकार 86 टक्क्यांनी, तर अँड्रॉइड (Android) उपकरणांवर 35 टक्क्यांनी वाढले आहेत. याउलट, वेब ब्राऊझरवरून होणाऱ्या फसवणुकीत 10 टक्क्यांनी घट झाली आहे. यावरून सायबर गुन्हेगारांनी संगणकांपेक्षा मोबाईल वापरकर्त्यांना आपले मुख्य लक्ष्य केले असल्याचे स्पष्ट होते. कमी वेळात मोठी रक्कम लंपास करण्याचा प्रयत्न सायबर गुन्हेगारांकडून बँक खात्यांतील रक्कम लांबवण्याच्या प्रयत्नात मूल्याच्या दृष्टीने 35 टक्क्यांची वाढ झाली आहे. तसेच, फसवणुकीसाठी केला जाणारा कॉल वेळ 31 टक्क्यांनी आणि संपूर्ण फसवणूक सत्राचा वेळ 32 टक्क्यांनी कमी झाला आहे. गुन्हेगार अतिशय कमी वेळात, सामाजिक माध्यमांचा व स्वयंचलित तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना जाळ्यात ओढत आहेत. तज्ज्ञांचे मत बायोकॅचचे ग्लोबल फ्रॉड इंटेलिजन्स संचालक टॉमी पीकॉक यांनी सांगितले, “फसवणूक करणारे बेमालूमपणे अधिकृत वाटणारे संदेश पाठवून ग्राहकांचा विश्वास संपादन करतात. मेसेजची खातरजमा करण्याआधीच लोक घाईघाईने कृती करतात आणि फसवणुकीचे शिकार ठरतात.” तसेच, ग्लोबल ॲडव्हायझरी विभागाचे संचालक सुभाषीश बोस म्हणाले, “बँका, आरबीआय (RBI), I4C आणि पोलीस प्रशासन यांच्यातील ताळमेळ वाढणे ही दिलासादायक बाब आहे. मानवी वर्तनावर आधारित एआय (AI) तंत्रज्ञानामुळे बँकांना ग्राहकांचा खरा हेतू ओळखून वेळेआधीच पावले उचलणे शक्य होत आहे.” सुरक्षा यंत्रणांमुळे 12 टक्क्यांनी रोखली फसवणूक युपीआय (UPI), मोबाईल बँकिंग आणि ई-कॉमर्सचा वाढता वापर यामुळे डिजिटल पेमेंट सोपे झाले असले तरी धोकेही वाढले आहेत. मात्र, बायोकॅचच्या सुरक्षा उपायांमुळे वेळेत धोका ओळखून फसवणुकीच्या प्रयत्नांमध्ये 12 टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे. बायोकॅच तंत्रज्ञानाची व्याप्ती बायोकॅच हे तंत्रज्ञान ग्राहकांच्या डिजिटल बँकिंग वापरादरम्यान 3,000 हून अधिक निनावी डेटा पॉइंट्सचे (उदा. टच स्क्रीन वापरण्याची पद्धत, कीबोर्ड टायपिंग स्पीड) विश्लेषण करते. सध्या जगभरात 370 पेक्षा जास्त वित्तीय संस्था या तंत्रज्ञानाचा वापर करत असून दरमहा 19 अब्ज युझर सेशन्सचे विश्लेषण केले जाते, ज्याद्वारे 1.8 अब्ज उपकरणांवरील 70 कोटींहून अधिक ग्राहकांचे रक्षण केले जात आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

https://doonitednews.in/advertisement-rate-card/

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »