
अनुदानाचा धनादेश स्वीकारल्यानंतर नगराध्यक्ष प्रियंका विश्वकर्मा व इतर पदाधिकाऱ्यांसोबत एकत्र आलेले घरकुल लाभार्थी.
चांदूर रेल्वे नगरपरिषद प्रशासनाने प्रधानमंत्री आवास योजनेला (PMAY) गती दिली आहे. या योजनेअंतर्गत शहरातील ३३ लाभार्थ्यांना पहिल्या टप्प्यातील प्रत्येकी १ लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले. नगराध्यक्षा प्रा. प्रियंका विश्वकर्मा यांच्या हस्ते अनुदा
.
या १ लाख रुपयांच्या अनुदानात राज्य शासनाचे ४० हजार रुपये आणि केंद्र शासनाचे ६० हजार रुपये समाविष्ट आहेत. हे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे.
यावेळी नगराध्यक्षा प्रा. प्रियंका विश्वकर्मा यांनी सांगितले की, ज्या पात्र लाभार्थ्यांची नावे काही त्रुटींमुळे राहिली आहेत, त्यांनाही घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील.
या अनुदान वितरण कार्यक्रमाला काँग्रेसचे गटनेते अनिस सौदागर, नगरसेवक हर्षल वाघ, अरिहंत गेडाम, नगरसेविका निलोफर शेख, कल्पना लांजेवार, पूनम कोकाटे तसेच नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
https://doonitednews.in/advertisement-rate-card/