आमदार सुधीर गाडगीळ यांच्या वाहनाचा अपघात: दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात कारची धडक, एअरबॅग्ज उघडल्याने टळला अनर्थ – Maharashtra News

आमदार सुधीर गाडगीळ यांच्या वाहनाचा अपघात:  दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात कारची धडक, एअरबॅग्ज उघडल्याने टळला अनर्थ – Maharashtra News



सांगली विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांच्या गाडीला रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. अचानक समोर आलेल्या एका दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला. सुदैवाने, कारमधील एअरबॅग्ज वेळेवर उघडल्यामुळे आमदार गाडगीळ यांच्यासह गाडीतील सर्व सहकारी मोठ्या अनर्थातून बचावले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आमदार सुधीर गाडगीळ हे उगार येथील एका कार्यक्रमाला उपस्थित राहून आपल्या चारचाकी वाहनाने परतत होते. त्यांच्यासोबत गाडीत त्यांचे स्वीय सहाय्यक, अंगरक्षक नागेश भोकरे, छायाचित्रकार विकास गुंडप आणि वाहनचालक गणपती दरेकर हेदेखील होते. त्यांची कार रत्नागिरी-नागपूर महामार्गावरून अंकलीच्या दिशेने जात असताना, वड्डी आणि कृष्णा घाट सर्व्हिस रोडजवळ अचानक एक दुचाकी त्यांच्या गाडीसमोर आली. या दुचाकीस्वाराला वाचवण्यासाठी चालकाने गाडी वळवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की कारच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले. मात्र, गाडीतील सुरक्षेसाठी असलेल्या एअरबॅग्ज तात्काळ उघडल्या गेल्याने मोठी जीवितहानी टळली. आमदारांना किरकोळ दुखापत; दुचाकीस्वार रुग्णालयात या अपघातात आमदार गाडगीळ यांच्या हाताच्या बोटाला किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांच्यासोबत असलेल्या इतर कर्मचाऱ्यांना (अंगरक्षक, छायाचित्रकार आणि चालक) कोणतीही इजा झालेली नाही, ते सर्वजण सुरक्षित आहेत. मात्र, या धडकेत दुचाकीचालक जखमी झाला असून, त्याला तातडीने १०८ रुग्णवाहिकेतून मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. अपघातानंतर आमदार गाडगीळ यांना दुसऱ्या वाहनाच्या मदतीने एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले असून तिथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि महामार्गावरील विस्कळीत झालेली वाहतूक पुन्हा सुरळीत केली. वाढत्या रस्ते अपघातांमुळे महामार्गांवरील वाहन सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हे ही वाचा… कोल्हापूरच्या राजकारणात टक्केवारीचा बॉम्ब:आमदार राजेश क्षीरसागरांचा कमिशन व्हिडिओ व्हायरल; 40 लाखांच्या व्यवहाराचा दावा कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत खळबळजनक आणि मोठी अपडेट समोर आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी थेट सत्ताधारी शिंदे गटाचे आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचा एक कथित व्हिडिओ समाजमाध्यमांवर शेअर करत भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. विकासकामांच्या टेंडरमधील टक्केवारीवरून हा वाद झाला असून, संबंधित व्यक्तीने आमदार क्षीरसागर यांना तब्बल ४० लाख रुपये दिल्याचा दावा इंगवले यांनी केला आहे. या व्हिडिओमुळे कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्यास सुरुवात केली आहे. सविस्तर वाचा…

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp