देशमुख यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दर महिन्याला ‘हेरिटेज वॉक’!: ऐतिहासिक फराहबक्ष महाल परिसरात इतिहासप्रेमींचा संकल्प; ‘भूषण वृक्ष अभियाना’चा शुभारंभ‎ – Ahilyanagar News

देशमुख यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दर महिन्याला ‘हेरिटेज वॉक’!:  ऐतिहासिक फराहबक्ष महाल परिसरात इतिहासप्रेमींचा संकल्प; ‘भूषण वृक्ष अभियाना’चा शुभारंभ‎ – Ahilyanagar News


अहिल्यानगरचा दैदिप्यमान इतिहास, येथील ऐतिहासिक वास्तू आणि असामान्य सांस्कृतिक वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी स्व. भूषण देशमुख यांनी वर्ष २०१६ पासून अविरतपणे दर रविवारी ‘हेरिटेज वॉक’ हा उपक्रम राबवला. हाच वारसा पुढे अखंड सुरू ठेवण्यासाठी, याप

.

येथील ऐतिहासिक फराहबक्ष महाल परिसरात रविवारी सकाळी भूषण देशमुख यांच्या स्मरणार्थ विशेष ‘हेरिटेज वॉक’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहरातील शंभराहून अधिक इतिहासप्रेमी आणि पर्यावरणप्रेमी नागरिक उपस्थित होते.

या विशेष हेरिटेज वॉक दरम्यान स्व. भूषण देशमुख यांच्या आवाजातील नगरच्या इतिहासाबद्दलची अभ्यासपूर्ण ध्वनिमुद्रित माहिती उपस्थितांना ऐकवण्यात आली, ज्यामुळे वातावरण भावूक झाले होते. स्व. भूषण यांच्या समवेत सुरुवातीपासून हेरिटेज वॉकचे संचालन करणारे सतीश गुगळे यांनी यावेळी फराहबक्ष महालाची निर्मिती, त्याची वास्तुकला आणि वैशिष्ट्यांची माहिती दिली.

इतिहास जतनासोबतच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी यावेळी ‘एक पेड… भूषण सर के नाम’ ही संकल्पना राबवण्यात आली. या संकल्पनेतून फराहबक्ष महाल परिसरात ‘खिरणी’चे रोप लावून भूषण देशमुख यांना स्मृतीवंदना देण्यात आली. इतिहास व नगरप्रेमी चेतन मेहता, स्व. भूषण यांचे चिरंजीव मोहित देशमुख आणि स्नूषा ऋतुजा देशमुख यांच्या हस्ते हे वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमात पंकज मेहेर, ठाकूर परदेशी, अमोल बास्कर, प्रफुल्ल पवार, डॉ. सुधाकर कुऱ्हाडे, ॲड. शाम असावा आणि सलीम सहारा यांनी फराहबक्ष महालाचा इतिहास, त्याची भव्य वास्तुशैली आणि ऐतिहासिक वारसा याबाबत उपस्थितांना माहिती दिली.

चांदबिबीच्या महालावर असलेल्या खिरणीच्या झाडाच्या बिया गोळा करून पर्यावरण मित्र अमित गायकवाड आणि तुषार लहारे यांनी खिरणीची शेकडो रोपे तयार केली आहेत. त्यातीलच एका रोपाचे रोपण काल करण्यात आले.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp