
नीट पेपरफुटीसाठी प्रधान यांचा राजीनामा मागितला तर दिल्ली आंदोलनादरम्यान मुलींवर विचित्र पद्धतीने लाठीचार्ज करण्यात आला त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा घेतला पाहिजे. या आंदोलनावेळी गृहमंत्री कुठे दिसले का? महाराष्ट्रात आणि देशात गृहमंत्रीच नाहीत, असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, सरकार चालवण्याची कुवत नसलेल्या लोकांच्या हातात सत्ता असणे हे देशाचे मोठे दुर्दैव आहे. 2014 मध्ये ज्यांवर विश्वास ठेवून जनतेने पाठिंबा दिला, त्यांनीच पाठीत खंजीर उपसला आहे. देशात महागाई, बेरोजगारी, पेट्रोलमधील भेसळ, पेपरफुटी, पक्ष फोडाफोडी आणि राम मंदिराच्या दानपेट्यांवरील चोरीचे प्रकार वाढले असून, हे सरकार सर्वच आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी दैनिक सामनाला दिलेल्या मुलाखतीमध्ये केला आहे. न्यायव्यवस्थेवर केली टीका उद्धव ठाकरे म्हणाले की, दिल्लीमध्ये आंदोलनात मुलींचे कपडे फाटेपर्यंत त्यांना मारहाण करण्यात आली, खिळे लावलेल्या काठ्यांनी गुंडांनी पोलिसांच्या साथीने मुलींना बदडले. अशा वेळी न्यायव्यवस्था काय धृतराष्ट्र झाली आहे का? असा संतप्त सवाल त्यांनी केला. कोर्टाकडे कुत्रे आणि मांजरांसाठी सुमोटो घ्यायला वेळ आहे, पण देशाच्या भविष्यावर होणाऱ्या हल्ल्यांकडे पाहायला वेळ नाही. ही अवस्था द्रौपदीने धृतराष्ट्राकडे न्याय मागण्यासारखी झाली आहे, अशी टीका त्यांनी न्यायाधीशांच्या भूमिकेवर केली. नावात ‘द्र’ असणाऱ्या सर्वांनी राजीनामा द्यावा उद्धव ठाकरे म्हणाले की, तरुणांना शिक्षण आणि रोजगार मिळत नाही. त्यांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी पळून दुसऱ्या पक्षात जातात आणि स्वतःचा विकास साधतात. पंतप्रधान 80 कोटी लोकांना मोफत रेशन देण्याच्या गमजा मारतात, पण देशातील तरुणांचा संताप आता अनावर झाला आहे. जंतर-मंतरवर जमा झालेल्या तरुणांची हिंमत पाहून देश अजून जिवंत असल्याचे जाणवले. हा तरुण वर्ग रस्त्यावर आहे तोपर्यंत देशात हुकूमशाही येऊ शकत नाही. फक्त धर्मेंद्रच नाही, तर सर्वच ‘द्र’ यांनी राजीनामा दिला पाहिजे, जेणेकरून देशावर दारिद्र्य येणार नाही.
हे वृत्त आम्ही अपडेट करत आहोत….
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
https://doonitednews.in/advertisement-rate-card/