पुण्यात युवा सहकार संस्थेचे उद्घाटन: सहकार आणि लोकशाही पूरक तत्वे, आमदार रोहित पवार यांचे प्रतिपादन – Pune News

पुण्यात युवा सहकार संस्थेचे उद्घाटन:  सहकार आणि लोकशाही पूरक तत्वे, आमदार रोहित पवार यांचे प्रतिपादन – Pune News



आमदार रोहित पवार यांनी सहकार आणि लोकशाहीला एकमेकांना पूरक तत्वे म्हटले आहे. पुणे येथील बीएमसीसी महाविद्यालयात युवा सहकार संस्थेच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. सर्वांना सोबत घेऊनच सर्वांगीण विकास होऊ शकतो, या लोकशाहीच्या पायाभूत तत्वावरच सहकार चळवळ उभी असल्याचे त्यांनी नमूद केले. भारत सरकारने ६ जुलै २०२१ रोजी केंद्रीय सहकार मंत्रालयाची स्थापना केली होती. २०२६ मध्ये या मंत्रालयाला पाच वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे २९ जून २०२६ ते ६ जुलै २०२६ या कालावधीत सहकार सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सहकार सप्ताहाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंटस् महासंघ मर्यादित यांच्यातर्फे बीएमसीसी अर्थात बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात ‘युवा सहकार’ संस्थेचा शुभारंभ आमदार रोहित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंटस् महासंघ मर्यादितचे अध्यक्ष सुहास पटवर्धन, बीएमसीसी महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप पौडेल, युवा सहकारी संस्थेचे मुख्य प्रवर्तक भीम बलकवडे, महासंघाचे उपाध्यक्ष सुभाष कर्णिक, सचिव मनीषा कोष्टी, तज्ज्ञ संचालक अॅड. प्रसाद परब, कोषाध्यक्ष चारुहास कुलकर्णी, अरूण निम्हण, महा प्रदेश युवा काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रथमेश आबनावे आणि सचिन इटकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार पवार यांनी सहकाराच्या वाढीसाठी तंत्रज्ञानाचा उपयोग कसा करता येईल आणि तरुणांच्या नवनवीन कल्पनांचे स्वागत कसे करता येईल, यावर भर दिला. ‘शेअरिंग इकोनॉमी’ ही संकल्पना अलीकडेच आली असली तरी, सहकार क्षेत्रात हे तत्व शंभर वर्षांपूर्वीच अस्तित्वात होते, असे ते म्हणाले. शहरी आणि ग्रामीण भागावर थेट परिणाम करणारी महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंटस् महासंघ मर्यादित ही एकमेव संस्था असून तिची व्याप्ती मोठी असल्याचेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी युवा सहकारी संस्थेचे मुख्य प्रवर्तक भीम बलकवडे, बीएमसीसी महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप पौडेल, अॅड. प्रसाद परब आणि सचिन ईटकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp