पैठणला गोदावरीवर साकारणार 45 फुटी पूल‎: दोन वर्षांत काम पूर्ण करण्याचे नियोजन, पुलाची लांबी 900, तर रुंदी 40 फूट राहणार – Chhatrapati Sambhajinagar News

पैठणला गोदावरीवर साकारणार 45 फुटी पूल‎:  दोन वर्षांत काम पूर्ण करण्याचे नियोजन, पुलाची लांबी 900, तर रुंदी 40 फूट राहणार – Chhatrapati Sambhajinagar News


पैठण गोदावरी नदीवरील पुलाची मागणी अखेर प्रत्यक्षात साकार होत आहे. श्री नाथ मंदिराजवळील पालखी ओटा ते जुने कावसान परिसराला जोडणारा हा पूल केंद्रीय मार्ग निधीतून उभारला जात असून त्यासाठी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे.

.

खासदार संदिपान भुमरे यांच्या पाठपुराव्यामुळे या प्रकल्पाचे बांधकाम सुरू झाले आहे. या पुलाची एकूण लांबी सुमारे ९०० फूट, रुंदी ४० फूट तर गोदावरीच्या पात्रापासूनची उंची तब्बल ४५ फूट असणार आहे. अत्यंत आधुनिक अशा ‘पाइल्स टेक्नॉलॉजी’च्या माध्यमातून हे काम करण्यात येत असून पुढील दोन वर्षांत ते पूर्ण करण्याचे नियोजन आहे. नाथ षष्ठी, आषाढी-कार्तिकी एकादशीला येणाऱ्या भाविकांची यामुळे सोय होणार आहे.

खासदार संदिपान भुमरे यांच्या पाठपुराव्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाने हा पूल उभारला जात आहे. यामुळे उद्योगधंद्यांची वाढ होईल आणि नाथषष्ठीच्या काळात लाखो वारकऱ्यांसाठी हा पूल वरदान ठरेल. – विलास भुमरे,

आमदार पुलाच्या कामाची पाहणी करताना खासदार संदिपान भुमरे. नदीपात्रात २२ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग झाला तरी पूल पाण्याखाली जाणार नाही. पुलाची उंची ४५ फूट ठेवली असल्याचे अभियंता राजेंद्र बोरकर म्हणाले.

कोकण भवनच्या अभियंत्यांच्या तांत्रिक पाहणीनंतर हे अंतिम डिझाइन निश्चित केले आहे. त्यामुळे हा पूल अधिक सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारा राहणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता राजेंद्र बोरकर यांनी सांगितले.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp