प्रसिद्ध गायक कुमार सानू यांच्या मुलाला कोरोनाची लागण: रुग्णालयातून व्हिडिओ शेअर करत दिली प्रकृतीची माहिती

प्रसिद्ध गायक कुमार सानू यांच्या मुलाला कोरोनाची लागण:  रुग्णालयातून व्हिडिओ शेअर करत दिली प्रकृतीची माहिती


देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असतानाच बॉलिवूडमधूनही एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध गायक कुमार सानू यांचा मुलगा आणि गायक जान सानू याला कोविड-19 ची लागण झाली असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्वतः जानने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना आपल्या प्रकृतीबाबत माहिती दिली. रुग्णालयातून व्हिडिओ शेअर; सकारात्मक राहण्याचा प्रयत्न रुग्णालयातून व्हिडिओ पोस्ट करत जान सानूने नेहमीच्या विनोदी शैलीत “चीन से आया मेरा दोस्त, कोविड को सलाम करो” असे कॅप्शन दिले. उपचार सुरू असतानाही त्याने सकारात्मक दृष्टीकोन कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. त्याचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी कमेंट्सद्वारे लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देत काळजी घेण्याचा सल्ला दिला. देशात पुन्हा वाढतोय कोरोनाचा धोका एकिकडे मुंबईत जान सानूला कोरोनाची लागण झाली असताना, दुसरीकडे देशातील इतर राज्यांमध्येही कोविडचे रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. आंध्र प्रदेशमध्ये नुकतेच कोरोनाचे आठ नवे रुग्ण आढळून आले असून, त्यापैकी दोघांचा मृत्यू झाल्याची चिंताजनक माहिती समोर आली आहे. ३० जानेवारी २०२० रोजी भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. तेव्हापासून आतापर्यंत अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा आणि ओमायक्रॉन असे कोरोनाचे अनेक व्हेरियंट्स समोर आले आहेत. आता पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढत असल्याने प्रशासनाकडून काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. ‘बिग बॉस’मधून आला होता चर्चेत जान सानू हा गायक कुमार सानू आणि त्यांच्या पहिल्या पत्नी रीटा भट्टाचार्य यांचा मुलगा आहे. ‘बिग बॉस’मध्ये सहभागी झाल्यानंतर तो विशेष चर्चेत आला होता. या कार्यक्रमात त्याने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक अनुभव मांडत वडिलांशी असलेल्या नात्याबाबतही स्पष्टपणे भाष्य केले होते. आता कोरोनाची लागण झाल्याने त्याच्यावर उपचार सुरू असून, तो लवकरच पूर्णपणे बरा होईल, अशी अपेक्षा त्याच्या चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे. जान सानूने शेअर केलेला व्हिडिओ..
हेही वाचा.. महेश, सोबत राहिल्याबद्दल थँक्यू…:कॅन्सरशी झुंज देणाऱ्या मेधा मांजरेकरांची भावनिक पोस्ट, म्हणाल्या- देवाने मला अदृश्य हात दिले मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकर यांच्या कुटुंबातून एक अत्यंत धक्कादायक आणि तितकीच भावनिक बातमी समोर आली आहे. महेश मांजरेकर यांच्या पत्नी आणि ‘दे धक्का’, ‘नटसम्राट’ फेम प्रसिद्ध अभिनेत्री मेधा मांजरेकर यांना कर्करोगाचे निदान झाले आहे. याबाबतची अधिकृत माहिती खुद्द मेधा मांजरेकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चाहत्यांना दिली आहे. वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला एक अतिशय हृदयस्पर्शी पोस्ट शेअर करत त्यांनी कर्करोगावरील उपचारांचा एक महत्त्वाचा टप्पा यशस्वीपणे पार पडल्याचे सांगितले असून, या कठीण काळात खंबीरपणे पाठीशी उभ्या राहिलेल्या कुटुंबाचे आणि मित्रपरिवाराचे आभार मानले आहेत. सविस्तर वाचा..

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp