महाराष्ट्रात डायरेक्ट डिग्रीच विकत मिळते!: पुणे विद्यापीठातील बोगस पदवी प्रकरणावरून रोहित पवारांचा शिक्षणमंत्री, मुख्यमंत्र्यांवर निशाणा – Maharashtra News

महाराष्ट्रात डायरेक्ट डिग्रीच विकत मिळते!:  पुणे विद्यापीठातील बोगस पदवी प्रकरणावरून रोहित पवारांचा शिक्षणमंत्री, मुख्यमंत्र्यांवर निशाणा – Maharashtra News



सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात चक्क ७० हजार रुपये घेऊन बोगस डिग्री आणि गुणपत्रक विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी विद्यापीठाने एका कर्मचाऱ्याला निलंबित करून पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी विद्यापीठाची अधिकृत ‘प्रेस नोट’ सोशल मीडियावर शेअर करत, “महाराष्ट्रात डायरेक्ट डिग्रीच विकत मिळते,” असा घणाघाती आरोप करत राज्याचे उच्च शिक्षणमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. रोहित पवारांचा सरकारवर प्रहार पुणे विद्यापीठातील या धक्कादायक प्रकारावर आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या सोशल मीडिया खात्यावरून तीव्र संताप व्यक्त केला आहे. पोस्टमध्ये रोहित पवार म्हणतात, “पुरावेच लागतात ना? अंधभक्तांनो घ्या आता पुरावे..! पेपर फोडायचा, प्रवेश मिळवायचा आणि तीन चार वर्षात डिग्री, एवढी उठाठेव कशाला? महाराष्ट्रात डायरेक्ट डिग्रीच विकत मिळते. उच्च शिक्षणमंत्री आता तरी झोपेतून उठा…! फडणवीस साहेब मानले राव तुमच्या सरकारच्या कारभाराला.!” या टीकेमुळे पदवी विक्रीच्या रॅकेटचा मुद्दा आता राजकीय पातळीवर मोठा चर्चेचा विषय ठरला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? (विद्यापीठाच्या प्रेस नोटनुसार) रोहित पवार यांनी शेअर केलेल्या आणि विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांच्या स्वाक्षरीने २९ जुलै २०२६ रोजी जारी झालेल्या अधिकृत पत्रकानुसार हा प्रकार उघडकीस आला आहे. पैसे घेऊन बनावट कागदपत्रे: विद्यापीठाच्या वित्त व लेखा विभागातील कर्मचारी रमेश दामोदर मुखेकर याने साहिल महेश कदम या विद्यार्थ्याला बी.कॉम. अभ्यासक्रमाचे गुणपत्रक आणि पदवी प्रमाणपत्र मिळवून देण्याचे आमिष दाखवले. ७० हजारांचा व्यवहार: यासाठी मुखेकर याने विद्यार्थ्याकडून गुगल पे द्वारे तब्बल ७०,००० रुपये स्वीकारले आणि त्याला व्हॉट्सॲपवर संगणकाद्वारे तयार केलेल्या मूळ कागदपत्रांसारख्या दिसणाऱ्या इमेजेस पाठवल्या. विद्यापीठाची कारवाई आणि पोलिसांचा तपास हा प्रकार उघडकीस येताच आणि सदर कागदपत्रे परीक्षा विभागाच्या अभिलेखांशी सुसंगत नसल्याचे सिद्ध होताच, विद्यापीठाने रमेश मुखेकर याला तत्काळ प्रभावाने सेवेतून निलंबित केले आहे. या प्रकरणाची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात घेऊन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. राजेंद्र तलवारे यांनी चतुःशृंगी पोलीस स्टेशनमध्ये रीतसर फिर्याद दाखल केली आहे. प्रशासनाचे आवाहन विद्यापीठाकडून देण्यात येणाऱ्या मूळ गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्रांमध्ये उच्च दर्जाच्या सुरक्षा मानकांचा समावेश असतो, त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी अशा अफवांवर किंवा भूलथापांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने केले आहे. रोहित पवार यांनी विद्यापीठाची शेअर केलेली ‘प्रेस नोट’..
हेही वाचा.. भाजप घाबरलेली पार्टी, अमित शहांनी राजीनामा द्यावा: विद्यार्थ्यांवरील कारवाईवरून संजय राऊत आक्रमक शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत भारतीय जनता पक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर सडकून टीका केली. विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर करण्यात आलेल्या कारवाईचा तीव्र निषेध करत राऊत यांनी अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच, शहांच्या आगामी पुणे दौऱ्याला पुणेकरांनी कडाडून विरोध करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. सविस्तर वाचा

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

https://doonitednews.in/advertisement-rate-card/

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »