digital products downloads

वडाळी तलावाजवळ बाळासाहेब ठाकरे स्मारक उभारणार: मंत्री संजय राठोड यांनी स्थळाची केली पाहणी – Amravati News

वडाळी तलावाजवळ बाळासाहेब ठाकरे स्मारक उभारणार:  मंत्री संजय राठोड यांनी स्थळाची केली पाहणी – Amravati News



राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी आज, शनिवारी अमरावती येथील वडाळी तलाव परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रस्तावित वंदनीय हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या नियोजित स्थळाला भेट देऊन विकास कामांचा आढावा घेतला. पाहणीदरम्यान मंत्री राठोड यांनी वडाळी उद्यान परिसरात भव्य, आकर्षक आणि दिमाखदार स्मारक उभारण्याचे निर्देश दिले. हे स्मारक शहरातील मुख्य रस्त्यावरून स्पष्टपणे दिसेल, अशा प्रकारचा आराखडा तयार करण्याची सूचनाही त्यांनी केली. हे स्मारक अमरावती शहराची ओळख बनावे आणि नागरिकांसह पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. याबाबत मनपाच्या संबंधित अधिकाऱ्यांसोबतही त्यांनी सविस्तर चर्चा केली. वडाळी तलाव परिसराचे सौंदर्यीकरण, पर्यटन विकास, प्रकाश व्यवस्था, नागरिकांसाठी सुविधा आणि स्मारक उभारणी संदर्भातील सर्व बाबींवर शासन स्तरावर लवकरच बैठक आयोजित केली जाईल. या बैठकीत संपूर्ण प्रस्ताव अंतिम करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. संबंधित सर्व प्रक्रिया गतीने पूर्ण करून विकास कामांना चालना देण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी विविध मान्यवर पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका तसेच संबंधित विभागातील अधिकारी उपस्थित होते.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp