पुणे जिल्ह्यात गर्भलिंग निदान रॅकेटचा पर्दाफाश: एकाला अटक, डॉक्टरसह चौघांवर गुन्हा दाखल; ग्रामीण पोलिसांची कारवाई – Pune News

पुणे जिल्ह्यात गर्भलिंग निदान रॅकेटचा पर्दाफाश:  एकाला अटक, डॉक्टरसह चौघांवर गुन्हा दाखल; ग्रामीण पोलिसांची कारवाई – Pune News


पुणे जिल्ह्यात गर्भलिंग निदान रॅकेटचा पर्दाफाश: एकाला अटक, डॉक्टरसह चौघांवर गुन्हा दाखल; ग्रामीण पोलिसांची कारवाई - Pune News
पुणे ग्रामीण पोलिसांनी पुणे जिल्ह्यात गावोगावी सोनोग्राफीद्वारे महिलांचे गर्भलिंग निदान करणाऱ्या एका रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून, डॉक्टरसह अन्य चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत. या रॅकेटमध्ये गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) कायद्यातील विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी पोलिस निरीक्षक नारायण देशमुख उपस्थित होते. या प्रकरणी आण्णासाहेब गिरी (रा. केंडगाव, ता. दौंड, मूळ रा. पारनेर, जि. नगर) याला २० मे रोजी अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून गर्भलिंग निदान करण्यासाठी वापरले जाणारे सोनोग्राफी मशीन जप्त करण्यात आले आहे. तपासादरम्यान, डॉक्टर अतुल अंकुश जाधव (रा. लोहगाव), नरेंद्र साहेबराव ठाकरे (रा. केसनंद, ता. हवेली), मंदार सुरेश माळी (रा. किकवी, ता. भोर) आणि सुंदरम कदम (रा. उरुळीकांचन, ता. हवेली) यांचाही या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. नरेंद्र ठाकरे याच्याकडूनच आण्णासाहेब गिरीने सोनोग्राफी मशीन घेतल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाची सुरुवात १७ मे रोजी झाली, जेव्हा फिर्यादी डॉ. सचिन विठ्ठल गुजर यांना एका महिलेचे गर्भलिंग निदान करत असल्याचा व्हिडिओ पाठवण्यात आला. या व्हिडिओच्या आधारे डॉ. गुजर यांनी १९ मे रोजी यवत पोलिस ठाण्यात स्वतः फिर्याद दाखल केली. मुख्य आरोपी गिरी याला अटक केल्यानंतर त्याने स्वतः गर्भलिंग निदान करत असल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणात आतापर्यंत १५ साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. आरोपींच्या बँक खात्यांचे व्यवहार, मोबाईल सीडीआर आणि इतर तांत्रिक पुराव्यांचे विश्लेषण सुरू आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलिस अधिकारी बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांनी केली.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp