मेळघाटातील बोरधा ग्रामस्थांनी स्वतः खोदली बोअरवेल: 110 कुटुंबांनी अडीच लाख रुपये जमा करून पाणी समस्या सोडवली – Amravati News

मेळघाटातील बोरधा ग्रामस्थांनी स्वतः खोदली बोअरवेल:  110 कुटुंबांनी अडीच लाख रुपये जमा करून पाणी समस्या सोडवली – Amravati News



मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील बोरधा गावातील रहिवाशांनी पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी स्वतः पुढाकार घेतला आहे. प्रशासकीय अनास्थेमुळे पाणी मिळत नसल्याने, गावातील ११० कुटुंबांनी प्रत्येकी अडीच हजार रुपये जमा करून गावात बोअरवेल खोदली. यासाठी एकूण २ लाख ७५ हजार रुपये गोळा करण्यात आले. बोरधा गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई होती. वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून लक्ष दिले जात नव्हते. ५५० लोकसंख्या असलेल्या या गावाची गट ग्रामपंचायत राहू आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी गावकऱ्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. बोअरवेल खोदण्यासाठी कोणतीही औपचारिक बैठक घेण्यात आली नाही. गावातील चार-पाच तरुणांनी रात्री एकत्र बसून या समस्येवर चर्चा केली. त्यांनी बोअरवेलचा पर्याय निवडला आणि दुसऱ्या दिवशी एका खाजगी यंत्रणेकडून खर्चाची माहिती घेतली. ही माहिती प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवण्यात आली. विशेष म्हणजे, गावातील प्रत्येक कुटुंबाने या तरुणांच्या प्रस्तावावर विश्वास दाखवला आणि रक्कम गोळा करण्यासाठी मदत केली. अवघ्या आठ दिवसांत २ लाख ७५ हजार रुपये जमा झाले. काही कुटुंबांकडे पैसे नसल्याने त्यांनी सावकाराकडून उसनवारी केली, तर काहींनी दागिने गहाण ठेवून किंवा घरची बकरी विकून वेळेवर रक्कम जमा केली. बोअरवेलसाठी योग्य जागा शोधण्यासाठी मध्यप्रदेश येथील एका कंपनीची मदत घेण्यात आली. गावात असलेल्या हँडपंपमध्ये पाणी येत नसल्याने, दुसरी जागा निश्चित करण्यात आली. बोअर करताना तब्बल साडेसहाशे फूट खोल खड्डा खोदण्यात आला. पाण्याच्या स्त्रोताजवळ पोहोचल्यावर, अतिरिक्त शंभर फूट पाईपसाठी वेगळे पैसे लागतील असे सांगण्यात आले. गावकऱ्यांनी गोळा केलेल्या रकमेत हे शक्य नसल्याने, खालच्या शंभर फुटाचे केसिंग (प्लॅस्टिक पाईपचे आवरण) थांबवण्यात आले. यामुळे पाणी थोडे कमी दाबाने येत असले तरी, गावकरी या प्रयत्नावर समाधानी आहेत. पूर्वी पाणी आणण्यासाठी त्यांना गावाबाहेर एक ते दीड किलोमीटर अंतर जावे लागत होते. या बोअरवेलसाठी पुढाकार घेणाऱ्यांमध्ये मुंगा काळमा धिकार, सोमा रोना कासदेकर, चंदू नंदराम धिकार, डाबली बापूराव धिकार, राजेश काळमा कासदेकर, झुले जिरगा धिकार, प्रतिराम सोनाजी चिमोटे, नंदराम बिसराम धिकार, रेखा शंकर कासदेकर, प्रमिला काळमा कासदेकर, टुमली बालू धिकार, शांती लाभा कासदेकर व इतरांचा समावेश आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp