मनपा शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी उपाययोजना करा- स्थायी सभापती – Akola News

मनपा शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी उपाययोजना करा- स्थायी सभापती – Akola News



अकोला महानगरपालिकेच्या शाळांचे सत्र लवकरच सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेचे स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी गुरुवारी स्थायी समिती सभागृहात शिक्षण विभागाची आढावा बैठक घेऊन महापालिकेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी उपाययोजनांबाबत अधिकाऱ्यांना निर्देश दिले. या बैठकीला नगरसेवक जयंत मसने, सभागृह नेते पवन महल्ले, नगरसेवक रफीक सिद्दीकी, सुनील मेश्राम, नितीन ताकवाले, रणजीत खेडकर उपस्थित होते. बैठकीत सभापती अग्रवाल यांनी, आगामी शैक्षणिक सत्र २०२६-२७ सुरु होणार असल्याने शिक्षण विभागांतर्गत करण्यात येणारी तयारी व उपाययोजनासंदर्भात आढावा घेतला. तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी आवश्यकता असल्यास कंत्राटी पद्धतीद्वारे शिक्षक घेणे, मनपाच्या शाळांचे रेकॉर्ड डिजिटलाइज करून जतन करणे, पासवाचे दिवस लक्षात घेता गळणाऱ्या शाळांची तातडीने दुरूस्ती करणे, नगरसेवकांद्वारे शाळा किंवा शिक्षण संदर्भातील तक्रारींचे निराकरण तातडीने करणे, मनपा शाळांमध्ये नियमित भेटी देऊन विद्यार्थ्यांना येणाऱ्या समस्या जाणून त्याचे तत्काळ निवारण करणे, मनपांच्या शाळांच्या शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी उपाययोजना करणे, शाळेत उशिरा येणाऱ्या शिक्षकांना वेळेत येण्याची ताकिद देण्यास सांगितले. तसेच ताकिद दिल्यावरही त्यांच्या वर्तणुकीत बदल झाला नाही तर त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश स्थायी समिती सभापतींनी दिले. मनपांच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी तपासणी समिती गठीत करण्याचे निर्देशही स्थायी समिती सभापतींनी दिले. याप्रसंगी शिक्षणाधिकारी हरिश्चंद्र इटकर, कार्यक्रम अधिकारी समग्र शिक्षा अभियान हबीबुर्रहमान, शिक्षण विभागाचे संजय खराटे आदींची उपस्थिती होती. स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी बैठक घेतली. अॅक्शन प्लाननुसार बदल शाळांचे रेकॉर्ड डिजिटल करणार, गळक्या शाळांची दुरुस्ती करणार, शिक्षक कमी पडू नये, यासाठी कंत्राटी शिक्षकांची भरती करणार. उशिरा येणाऱ्या व लवकर जाणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करणार. शैक्षणिक गुणवत्तेवर नियंत्रण आणि पायाभूत सुविधा विकासासाठी समिती गठीत करणार. शैक्षणिक तक्रारींचे तत्काळ निवारण करणार तसेच विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp