‘क्रेडाई’चे 100 ट्रॅफिक वॉर्डन पुण्यात तैनात: वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुणे पोलिसांसोबत सामंजस्य करार – Pune News

‘क्रेडाई’चे 100 ट्रॅफिक वॉर्डन पुण्यात तैनात:  वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुणे पोलिसांसोबत सामंजस्य करार – Pune News



पुणे शहर वाहतूक पोलिस आणि बांधकाम व्यावसायिकांची शिखर संस्था ‘क्रेडाई पुणे’ यांच्यात वाहतूक व्यवस्था प्रभावी, सुरक्षित आणि सुरळीत करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारानुसार, ‘क्रेडाई पुणे’ने पुणे शहर वाहतूक पोलिसांना आगामी तीन महिन्यांसाठी १०० ट्रॅफिक वॉर्डन उपलब्ध करून दिले आहेत. पुण्यात सध्या सुरू असलेला पावसाळा, आगामी संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आणि त्यानंतर येणारा गणेशोत्सव या गर्दीच्या काळात वाहतुकीचे व्यवस्थापन करणे आव्हानात्मक असते. याच पार्श्वभूमीवर हे ट्रॅफिक वॉर्डन पोलिसांना वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मदत करतील. या उपक्रमांतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या ट्रॅफिक वॉर्डनना आज, ३ जुलै २०२६ रोजी पुणे शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मार्गदर्शन केले. नागरिकांना सुरक्षित व सुरळीत वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी सर्व वॉर्डननी समन्वयाने, शिस्तबद्ध आणि जबाबदारीने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवून पोलिसांना सहकार्य केल्याबद्दल त्यांनी ‘क्रेडाई पुणे’ संस्थेचे आभार मानले. हा उपक्रम पोलिस आयुक्त अमितेश कुमार आणि सह पोलिस आयुक्त संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्षात आला आहे. यासाठी अप्पर पोलिस आयुक्त मनोज पाटील आणि वाहतूक शाखेचे पोलिस उप-आयुक्त डॉ. संदीप बाजीभाकरे यांनी विशेष पुढाकार घेतला. ‘क्रेडाई पुणे’चे अध्यक्ष मनीष जैन, संयोजक संजय देशपांडे आणि प्रशासक कर्नल राम यांच्या सकारात्मक सहकार्यामुळे हा प्रकल्प साकार झाला. हे ट्रॅफिक वॉर्डन पुणे पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये, गर्दीच्या ठिकाणी, पालखी मार्गावर आणि गणेशोत्सवात वाहतूक नियंत्रण, नागरिकांना मार्गदर्शन व वाहतूक कोंडी सोडवण्याचे काम करतील. नागरिकांनीही या ट्रॅफिक वॉर्डन्सनी दिलेल्या सूचनांचे पालन करून सुरक्षित आणि शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्थेसाठी सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस उप-आयुक्त डॉ. संदीप बाजीभाकरे यांनी केले आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp