विजेच्या खांबांजवळ जनावरे बांधू नका, दुचाकी लावू नका: वीज खंडित झाल्यास किंवा दुर्घटना घडल्यास तात्काळ ‘1912’ वर कॉल करा- महावितरण – Chhatrapati Sambhajinagar News

विजेच्या खांबांजवळ जनावरे बांधू नका, दुचाकी लावू नका:  वीज खंडित झाल्यास किंवा दुर्घटना घडल्यास तात्काळ ‘1912’ वर कॉल करा- महावितरण – Chhatrapati Sambhajinagar News


पावसाळ्याला सुरुवात झाल्याने वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसामुळे विद्युत दुर्घटनांचा धोका वाढला आहे. तुटलेल्या विजेच्या तारा, कोसळलेले खांब, ट्रान्सफॉर्मर, फिडर पिलर आणि शॉर्टसर्किटमुळे अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे

.

महावितरणने दिलेल्या माहितीनुसार, अतिवृष्टी आणि वादळामुळे विजेच्या तारा तुटणे, खांब कोसळणे, ट्रान्सफॉर्मरमध्ये ठिणग्या पडणे किंवा शॉर्टसर्किट होणे अशा घटना घडू शकतात. अशा वेळी लोंबकळणाऱ्या किंवा तुटलेल्या तारांना स्पर्श करू नये. ट्रान्सफॉर्मर, फिडर पिलर किंवा विजेच्या खांबाजवळ शॉर्टसर्किट झाल्यास त्या परिसरात जाणे टाळून तातडीने महावितरणला माहिती द्यावी.

पावसाळ्यात घरातील ओलसर विद्युत उपकरणे, शेती पंपावरील स्विचबोर्ड तसेच उघड्या विद्युत तारा यांच्यामुळेही अपघात होऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी घर, सोसायटी आणि परिसरातील विद्युत यंत्रणा सुरक्षित असल्याची खात्री करून घ्यावी. पत्र्याच्या घरांमध्ये राहणाऱ्यांनीही आवश्यक सुरक्षात्मक उपाययोजना कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

विजेच्या खांबांना जनावरे बांधू नयेत किंवा दुचाकी टेकवून ठेवू नयेत. तसेच पूरस्थितीत नदीकाठच्या भागात विशेष दक्षता घ्यावी. भूमिगत वीजवाहिन्यांमध्ये पाणी शिरणे, झाडे कोसळणे किंवा वीज पडल्याने वीजपुरवठा खंडित होण्याबरोबरच जीवितास धोका निर्माण होऊ शकतो.

अतिवृष्टी, वादळ किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे वीजवाहिन्या तुटणे, खांब कोसळणे अथवा विद्युत दुर्घटनेची शक्यता निर्माण झाल्यास, नागरिकांनी त्याची माहिती महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राशी 1912 या हेल्पलाईन क्रमांकावर किंवा 1800-212-3435 व 1800-233-3435 या टोल-फ्री क्रमांकांवर तात्काळ द्यावी. छत्रपती संभाजीनगर शहर मंडळासाठी 7066042412, ग्रामीण मंडळासाठी 7875756652 आणि जालना मंडळासाठी 7875764144 या स्थानिक नियंत्रण कक्षाच्या क्रमांकांवरही संपर्क साधता येईल.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp