
वसई-विरारमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे कामण, भेंडीपाडा आणि मोरी गाव परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरून निर्माण झालेल्या पूरस्थितीत अडकलेल्या 15 नागरिकांची वसई-विरार महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने सुखरूप सुटका केली असून, संभाव्य धोका टाळण्यासाठी आणखी 50 जणांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर केले आहे. या नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका वाहतूक व्यवस्थेलाही बसला असून, पश्चिम रेल्वेची उपनगरीय लोकल सेवा पाण्यामुळे केवळ वसई स्थानकापर्यंतच मर्यादित राहिल्याने नालासोपारा आणि विरारकडे जाणाऱ्या हजारो प्रवाशांना व चाकरमान्यांना आता वसई स्थानकातच अडकून पडावे लागले असून, नाईलाजास्तव त्यांना ही रात्र तिथेच काढावी लागणार असल्याचे चित्र आहे. वसई-विरारमध्ये अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीत महापालिकेच्या पथकाने तत्परतेने बचावकार्य करत अडकलेल्या 15 नागरिकांची सुखरूप सुटका केली असून, संभाव्य धोका लक्षात घेऊन आणखी 50 जणांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले आहे. एकीकडे प्रशासनाकडून या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना दिलासा देण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असले तरी, दुसरीकडे अतिवृष्टीमुळे लोकल सेवेचा मोठा खोळंबा झाल्याने विरार आणि नालासोपाऱ्याकडे जाणारे अनेक प्रवासी व चाकरमानी रेल्वे स्थानकावरच अडकून पडले आहेत. चाकरमानी वसई स्थानकातच अडकले दिवसभर कोसळलेल्या मुसळधार पावसानंतर रात्र उलटूनही वसई-विरारकरांच्या अडचणी मात्र कमी झालेल्या नाहीत. पश्चिम रेल्वेची उपनगरीय लोकल सेवा केवळ वसई स्थानकापर्यंतच मर्यादित राहिल्याने नालासोपारा आणि विरारच्या दिशेने जाणारे हजारो चाकरमानी वसई स्थानकातच हतबल होऊन अडकून पडले आहेत. त्यातच वसई-विरार महापालिकेची परिवहन सेवाही पूर्णपणे ठप्प झाल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत असून, या हतबल परिस्थितीचा गैरफायदा घेत केवळ एका खाजगी ट्रॅक्टरद्वारे केल्या जाणाऱ्या वाहतुकीसाठी नागरिकांकडून भरमसाठ पैशांची लूट केली जात असल्याचा संतापजनक प्रकारही समोर आला आहे. चाकरमान्यांकडून ट्रॅक्टरचा वापर सळधार पावसामुळे वसई-विरार परिसरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून रिक्षा, एसटी आणि महानगरपालिकेची परिवहन बससेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. यामुळे नालासोपारा आणि विरारकडे जाणाऱ्या प्रवाशांसमोर आणि चाकरमान्यांसमोर घरी कसे पोहोचायचे, असा मोठा यक्षप्रश्न उभा राहिला आहे. काही हतबल नागरिक पर्यायी मार्ग म्हणून ट्रॅक्टरचा आधार घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत; परंतु ही ट्रॅक्टर सेवाही केवळ काही मर्यादित अंतरापर्यंतच उपलब्ध असल्याने प्रवाशांचा प्रवास अत्यंत खडतर झाला असून त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वसई-विरारमधील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत दुसरीकडे, पावसाच्या तडाख्यामुळे अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला असून इन्व्हर्टरच्या बॅटरीही संपल्याने नागरिकांवर अंधारात रात्र काढण्याची वेळ आली आहे. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा विस्कळीत झाला असून, खाण्यापिण्यासह अत्यावश्यक वस्तूंचीही तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. वीज, पाणी, अन्न आणि वाहतूक यांसारख्या सर्वच मूलभूत सुविधांचा पुरता बोजवारा उडाल्याने वसई-विरारमधील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. नागरिकांचे इतके हाल होत असूनही प्रशासकीय यंत्रणा आणि राजकीय नेतेमंडळी अद्याप मदतीसाठी पुढे न आल्याने, प्रशासनाला या भीषण परिस्थितीचे कोणतेही सोयरसुतक नसल्याचे संतापजनक चित्र पाहायला मिळत आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
