भारतात राष्ट्राध्यक्ष पद्धत लागू होणार ही राऊतांची निव्वळ अफवाच: 2029 ची निवडणूक फडणवीसांच्या नेतृत्वातच लढली जाईल- नवनाथ बन – Mumbai News

भारतात राष्ट्राध्यक्ष पद्धत लागू होणार ही राऊतांची निव्वळ अफवाच:  2029 ची निवडणूक फडणवीसांच्या नेतृत्वातच लढली जाईल- नवनाथ बन – Mumbai News

भारतामध्ये राष्ट्राध्यक्ष पद्धत लागू होणार असल्याच्या अफवा पसरवून जनतेची दिशाभूल करण्याचे काम संजय राऊत करत आहेत. भारताच्या संविधानात असा कोणताही बदल होणार नसून पंतप्रधान पद हेच देशातील सर्वोच्च लोकशाही पद आहे.नरेंद्र मोदी यांना देशाच्या जनतेने सलग 3

.

नवनाथ बन म्हणाले की, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामाचे कौतुक केल्याबद्दल संजय राऊत यांचे आभार मानताना बन यांनी मविआवर टीका केला आहे. मविआच्या काळात काम करणारा एकही मंत्री नव्हता तर भाजपचे सर्व मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण सातत्याने लोकांमध्ये राहून जनतेची कामे करतात, असा टोला त्यांना मविआला लगावला आहे. भाजपमध्ये घराणेशाही नसून कार्यकर्त्यांच्या कर्तृत्वाला महत्त्व दिले जाते. त्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार हे भविष्यवाणीने नव्हे तर पक्षाच्या निर्णयाने ठरते आणि 2029 पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहतील. उबाठा गटात नगरसेवकाचे तिकीट देण्याचाही अधिकार नसलेले संजय राऊत भाजपचा मुख्यमंत्री कोण होणार हे सांगत आहेत. भारतीय जनता पक्षाचे निर्णय केंद्रीय आणि राज्य नेतृत्व घेत असून पक्ष कार्यकर्त्यांच्या बळावर चालतो, इतरांच्या सांगण्यावर नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. 2029 ची विधानसभा निवडणूकही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातच लढवली जाईल.

..विरोधकांचे राजकारणाचे दुकान बंद होईल

नवनाथ बन म्हणाले की, एक देश एक निवडणूक हा केवळ भारतीय जनता पक्षाचा नव्हे तर देशातील 140 कोटी जनतेच्या हिताचा विषय आहे. नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्ष संविधानाचे रक्षण करत आहे, आणीबाणी लादणाऱ्या काँग्रेससोबत राहणाऱ्यांनी आम्हाला संविधानाचे धडे देऊ नयेत.एक देश, एक निवडणूक’ लागू झाल्यास विरोधकांचे राजकारणाचे दुकान बंद होईल असेही त्यांनी म्हटले आहे.

मिसिंग लिंक प्रकल्पात गैरव्यवहार नाही

नवनाथ बन म्हणाले की, मिसिंग लिंक प्रकल्पात कोणताही गैरव्यवहार झाला नसून नागरिकांसाठी मार्ग पुन्हा सुरू झाला आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः त्या मार्गावरून प्रवास केला.राऊतांनी महाविकास आघाडीने 90 हजार कोटींची लूट केली; आधी त्याचा हिशोब द्यावा. तर लोकांना पैशाने विकत घेता येत नाही, त्यासाठी प्रेम, विश्वास आणि कार्यकर्त्यांशी नाळ जोडलेली असावी लागते, असा टोला बन यांनी लगावला आहे.

कोणालाही सोडणार नाही

नवनाथ बन म्हणाले की, काँग्रेसच्या भूमिकेमुळे उद्धव ठाकरे राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला गेले नव्हते, त्यामुळे राम मंदिराबाबत बोलण्याचा नैतिक अधिकार त्यांना नाही. मंदिरासंदर्भातील कोणत्याही गैरव्यवहाराची चौकशी सुरू असून कोणीही दोषी असला तरी त्याला सोडले जाणार नाही, जनतेच्या पैशाचा हिशोब घेतला जाईल.

जनता भाजपलाच साथ देईल

नवनाथ बन म्हणाले की, भारतीय जनता पक्षाला सातत्याने मिळणारा जनाधार हा जनसेवा, विकास आणि हिंदुत्वाच्या भूमिकेमुळे आहे. भाजप सतत जनतेमध्ये राहून काम करत असल्याने नागरिकांचा विश्वास पक्षावर कायम आहे. उबाठा गटाने हिंदुत्व आणि बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडल्यामुळे त्यांचे अस्तित्व कमी होत चालले आहे. यामुळे आगामी काळातही महाराष्ट्र आणि देशातील जनता भाजपलाच साथ देईल.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp