लव विल स्पार्क अगेन: दुलकर-पूजा हेगडे यांच्या ‘श्री श्री’ चा फर्स्ट लुक रिलीज, पहिल्यांदाच एकत्र दिसणार

लव विल स्पार्क अगेन:  दुलकर-पूजा हेगडे यांच्या ‘श्री श्री’ चा फर्स्ट लुक रिलीज, पहिल्यांदाच एकत्र दिसणार


दुलकर सलमानने आपल्या ४१व्या चित्रपटाचे शीर्षक जाहीर केले आहे. आतापर्यंत ‘DQ41’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या चित्रपटाचे नाव ‘श्री श्री’ असे ठेवण्यात आले आहे. दुलकरने सोशल मीडियावर चित्रपटाचे फर्स्ट लुक पोस्टर शेअर करत याची घोषणा केली आहे. चित्रपटाच्या फर्स्ट लुक पोस्टरमध्ये दुलकर आणि पूजा हेगडे सुंदर नैसर्गिक स्थळांमध्ये दिसत आहेत. पोस्टरवर ‘लव विल स्पार्क अगेन’ ही टॅगलाइनही लिहिलेली आहे, जी चित्रपटाच्या रोमँटिक थीमची झलक देते. विशेष बाब म्हणजे या चित्रपटाद्वारे दुलकर आणि पूजा पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. चित्रपटाचे चित्रीकरण खूप आधीच सुरू झाले होते, पण आता निर्मात्यांनी त्याचे नाव समोर आणले आहे. यापूर्वी निर्मात्यांनी चित्रपटाच्या चित्रीकरणाची काही झलक शेअर केली होती. चित्रपटात धीक्षित शेट्टी देखील महत्त्वाची भूमिका साकारत आहे चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन रवी नेलाकुडिटी यांनी केले आहे. तर याची निर्मिती सुधाकर चेरुकुरी यांनी एसएलव्ही सिनेमाजच्या बॅनरखाली केली आहे. यात धीक्षित शेट्टी देखील महत्त्वाची भूमिका साकारत आहेत आणि संगीत जी.व्ही. प्रकाश कुमार यांनी दिले आहे. चित्रपटाला मल्टी लँग्वेज पॅन इंडिया चित्रपट म्हणून 2026 मध्ये प्रदर्शित केले जाईल. मात्र निर्मात्यांनी अजून याची प्रदर्शनाची तारीख जाहीर केलेली नाही.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp