
नाशिकच्या सावळा घाटात मंगळवारी सायंकाळी अत्यंत भीषण अपघात घडला. एका भरधाव ट्रकचे ब्रेक अचानक फेल झाल्याने तो थेट पुढच्या इको कारवर जाऊन आदळला. या जोरदार धडकेमुळे ती कार आणखी एका पुढच्या ट्रकमध्ये घुसली आणि दोन मोठ्या वाहनांच्या मध्ये या कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. या दुर्दैवी घटनेत कारमधील चार जणांचा मृत्यू झाला आहे. उतारावर घडला अनर्थ मिळालेल्या माहितीनुसार, पेठ-दिंडोरीच्या सीमेवर असलेल्या सावळा घाटातून मंगळवारी संध्याकाळी एक इको कार सावकाश मार्गस्थ होत होती. घाटाचा रस्ता आणि त्यात तीव्र उतार असल्याने वाहनांचा वेग मर्यादित होता. मात्र, याच वेळी मागून येणाऱ्या एका अवजड ट्रकचे ब्रेक अचानक निकामी झाले. चालकाचे गाडीवरील नियंत्रण पूर्णपणे सुटले आणि हा बेभान झालेला ट्रक थेट समोरून जाणाऱ्या इको कारवर मागून धडकला. दोन ट्रकांच्या मध्ये कारचा चक्काचूर हा अपघात इतका भयानक होता की, धडक बसताच इको कार थेट तिच्या पुढे चाललेल्या दुसऱ्या एका ट्रकमध्ये जाऊन वेगाने घुसली. एका सेकंदात पुढे आणि मागे अशा दोन्ही बाजूंनी दोन महाकाय ट्रकांच्या मध्ये या छोट्या कारचा अक्षरशः लगदा झाला. यात कारमधील तीन प्रवाशांनी जागेवरच प्राण सोडले. मदतीची धावपळ आणि वाहतूक कोंडी या घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या नागरिकांनी आणि पोलिसांनी तिथे धाव घेतली. कारचा पत्रा कापून आत अडकलेल्या दोन गंभीर जखमींना मोठ्या शर्थीने बाहेर काढण्यात आले. त्यांना तातडीने नाशिकच्या रुग्णालयात हलवले, मात्र तिथे उपचारादरम्यान आणखी एकाने अखेरचा श्वास घेतला. क्रेनच्या साहाय्याने वाहतूक पूर्ववत या विचित्र आणि भीषण अपघातामुळे घाटातील दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी तात्काळ क्रेन बोलावून अपघातग्रस्त वाहने बाजूला केली आणि काही तासांच्या प्रयत्नांनंतर घाटातील वाहतूक पुन्हा सुरळीत केली. या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. हेही वाचा.. अहिल्यानगरमध्ये संत निवृत्तीनाथ महाराजांच्या दिंडीत अपघात:पिकअपच्या धडकेत वारकरी गंभीर जखमी, चालक फरार संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यावर आज सकाळी एक मोठे संकट ओढवले. नगर-सोलापूर महामार्गावरील रुईछत्तीशी शिवारात रस्ता ओलांडणाऱ्या एका वारकऱ्याला भरधाव पिकअपने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात वारकरी गंभीर जखमी झाला असून, घटनेनंतर चालक गाडी तिथेच सोडून पळून गेला आहे. 2 दिवसांपूर्वीच पुण्यात सासवडजवळ अशाच एका अपघातात ट्रकने वारकरी महिलांना चिरडले होते. 30 जुलैपूर्वी कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात: कृषीमंत्र्यांची घोषणा; पावसाबाबतही दिले अपडेट, बोगस बियाणे प्रकरणात 18 कंपन्यांवर कारवाई राज्यातील बोगस सोयाबीन बियाणे प्रकरणात सरकारने कडक भूमिका घेतली असून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या 18 बियाणे कंपन्यांविरोधात कठोर कारवाई सुरू करण्यात आली आहे. कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी त्यांनी कर्जमाफी, पावसाची स्थिती, पिकांचे नुकसान आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत चर्चांवरही भूमिका स्पष्ट केली. सविस्तर वाचा
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
