शाळेच्या पहिल्याच दिवशी खोलीचा स्लॅब कोसळला: मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस; लोखंडी गज पूर्णपणे गंजले; भिंतींनाही तडे‎ – Akola News

शाळेच्या पहिल्याच दिवशी खोलीचा स्लॅब कोसळला:  मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस; लोखंडी गज पूर्णपणे गंजले; भिंतींनाही तडे‎ – Akola News

.

तालुक्यातील पारद येथील जिल्हा परिषद शाळेत सोमवारी धक्कादायक प्रकार समोर आला. उन्हाळी सुट्यांनंतर शाळा सुरू होण्याचा पहिलाच दिवस असल्याने, ग्रामपंचायतीने नुकतीच रंगरंगोटी केलेल्या व विविध शैक्षणिक चित्र आणि आकर्षक ‘तारांगण’ रेखाटलेल्या वर्गखोलीत विद्यार्थ्यांना बसवण्याचा शिक्षकांचा बेत होता. मात्र, विद्यार्थी प्रार्थनेसाठी बाहेर गेले असताना अचानक या वर्गखोलीचा स्लॅब कोसळला. सुदैवाने यावेळी खोलीत कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

ही वर्गखोली २००९-२०१० या वर्षात ‘सर्व शिक्षा अभियानांतर्गत बांधली होती. परंतु, निकृष्ट बांधकाम व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या खोलीचे लोखंडी गज पूर्णपणे गंजले असून तुटून पडत आहेत. केवळ हीच खोली नाही, तर शाळेच्या इतर खोल्या शिकस्त झाल्या आहेत. भिंतींना तडे गेले आहेत. इमारतीची दुरवस्था कित्येक वर्षांपासून झालेली असताना व बांधकाम विभागाच्या चुकीमुळे स्लॅब कोसळला असताना, अवघ्या चार महिन्यांपूर्वीच पदभार घेतलेले मुख्याध्यापक उमेश सराळे यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर चुका लपवण्यासाठी मुख्याध्यापकांना बळीचा बकरा बनवले जात असल्याची चर्चा आहे. या शाळेतील दुर्दशा केवळ वर्गखोल्यांपुरती मर्यादित नाही. शाळेतील स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे विद्यार्थिनी आणि महिला शिक्षकांना चक्क दुसऱ्यांच्या घरी किंवा इतरत्र जावे लागत असल्याचे समजते. याशिवाय, शाळेला संरक्षण भिंत (कंपाउंड) नसल्यामुळे आवारात सतत मोकाट गुरांचा व इतर प्राण्यांचा वावर असतो. यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

मुख्याध्यापकांना नोटीस

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp