राम मंदिर आंदोलनावेळी उद्धव ठाकरे कुठे होते?: ठाकरे दरोड्याचा माल घेऊन मुख्यमंत्री झाले होते, नवनाथ बन यांचा संजय राऊतांवर पलटवार – Mumbai News

राम मंदिर आंदोलनावेळी उद्धव ठाकरे कुठे होते?:  ठाकरे दरोड्याचा माल घेऊन मुख्यमंत्री झाले होते, नवनाथ बन यांचा संजय राऊतांवर पलटवार – Mumbai News



उद्धव ठाकरे हे दरोड्याचा माल घेऊन मुख्यमंत्री झाले होते. युतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये निवडणूक लढवली असताना उद्धव ठाकरेंनी दरोडा टाकला आणि शिवसेनेच्या आमदारांना घेऊन ते मुख्यमंत्रीह झाले यावर राऊतांनी बोलले पाहिजे, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरेंचे सरकार लोकांनी निवडून दिलेले सरकार नव्हते. त्यांनी हिंदूत्व आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची चोरी केली आणि काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले तो खरा चोरीचा माल होता. नवनाथ बन म्हणाले की, राम मंदिर आंदोलनामध्ये उद्धव ठाकरे हे कुठेही नव्हते. उबाठा गटाचा एकही शिवसैनिक राम मंदिराच्या आंदोलनामध्ये नव्हता. देवेंद्र फडणवीस पहिल्या राम मंदिर आंदोलनावेळी 18 दिवस जेलमध्ये होते. बाबरीचा ढाचा पाडला तेव्हा कारसेवा करत देवाभाऊ आयोध्येत उपस्थित होते. त्यावेळी उद्धव ठाकरे कुठे होते? तुम्ही प्रभ श्री राम यांच्याबद्दल बोलू नये. उद्धव ठाकरे यांनी किमान पुस्तकामध्ये बघत तरी रामरक्षा म्हटली पाहिजे. राऊतांचा फुटबॉल झाला नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत यांचा फुटबॉल झाला आहे, ते एक दिवस उद्धव ठाकरेंच्या बाजूने बोलतात. उद्धव ठाकरेंनी लाथ मारली की शरद पवार यांच्या बाजूने बोलतात. पवारांनी लाथ मारली की राहुल गांधीकडे जातात त्यांनी दुसऱ्याबद्दल बोलू नये.जयंत पाटलांनी भेट का घेतली हे सांगितले आहे त्यामुळे राऊतांनी टीका करण्याचे काहीही काम नाही. डिलिमिटेशन बिलाला सर्वांनी पाठिंबा द्यावा नवनाथ बन म्हणाले की, महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन बिलाला सर्वच पक्षांनी पाठिंबा दिला पाहिजे. महिलांच्या हक्कासाठीचे हे विधेयक आहे. एकीकडे महिलांना लाडक्या बहीणी म्हणायचे आणि दुसरीकडे विधेयकाला विरोध करायचा हा संजय राऊत यांचा दुटप्पीपणा आहे. देशातील लोकप्रतिनिधी अतिशय हुशार आहे, एकमताने ते विधेयक मंजूर करतील असा विश्चास बन यांनी व्यक्त केला आहे. राऊतांनी कितीही विरोध केला तरी काही फरक पडणार नाही. राऊतांनी अफवांवर बोलू नये नवनाथ बन म्हणाले की, जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट का घेतली हे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात अनेक जण एनडीएमध्ये येत आहे, राऊतांनी अफवावर बोलू नये ते रोज सकाळी अफवा पसरवत असतात. त्यांनी आपल्या पक्षाकडे लक्ष दिले पाहिजे. शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएसोबत जाणार नाही, त्या सर्व अफव आहे या संजय राऊतांच्या वक्तव्यावर त्यांनी निशाणा साधला आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp