तैलिक महासभेने 200 विद्यार्थ्यांचा सत्कार केला: 25 महिलांना शिलाई मशीन; रामदास तडस, नवनीत राणा उपस्थित – Amravati News

तैलिक महासभेने 200 विद्यार्थ्यांचा सत्कार केला:  25 महिलांना शिलाई मशीन; रामदास तडस, नवनीत राणा उपस्थित – Amravati News



महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा आणि अमरावती जिल्हा तैलिक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सुमारे २०० गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, तसेच २५ गरजू महिलांना शिलाई मशीन भेट देण्यात आल्या. महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे राज्याध्यक्ष तथा माजी खासदार रामदास तडस आणि भाजप नेत्या व माजी खासदार नवनीत राणा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. शेगाव नाका चौक येथील अभियंता भवनमध्ये हा कार्यक्रम पार पडला. मंचावर समाजभूषण शंकरराव हिंगासपुरे, आर्वीच्या नगराध्यक्ष स्वाती प्रकाश गुल्हाने, मोर्शीच्या नगराध्यक्ष प्रतीक्षा रवींद्र गुल्हाने, विदर्भ कार्याध्यक्ष प्रा. विजयराव ढोले, महिला आघाडीच्या विदर्भ अध्यक्ष मोनिका उमक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सत्कार समारंभात गुणवंत विद्यार्थ्यांना कॉलेज बॅग, स्टील वॉटर बॉटल आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना नवनीत राणा यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलच्या अतिवापरापासून दूर राहून शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे,” असे सांगत त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. माजी खासदार रामदास तडस यांनी समाज एकसंघ राहिल्यास प्रगती अधिक वेगाने होईल, असे मत व्यक्त केले. त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण, करिअर, व्यक्तिमत्त्व विकास आणि समाजकार्यात सक्रिय राहण्याचे आवाहन केले. येत्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रातील तेली समाजाचे राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान, नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती, गरजू महिलांना स्वावलंबी करण्यासाठी शिवण मशीनचे वाटप आणि विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन असे विविध उपक्रम राबवण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागीय अध्यक्ष संजय हिंगासपुरे यांनी केले.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

https://doonitednews.in/advertisement-rate-card/

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »