
मोर्शी पोलिसांनी मनीमपूर येथील घरफोडीचा गुन्हा अवघ्या १२ तासांत उघडकीस आणत आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी चोरीस गेलेला १२,५०० रुपयांचा मुद्देमालही जप्त केला. मनीमपूर येथे घडलेल्या या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी तांत्रिक माहिती आणि गुप्त बातमीदारांचे सहाय्य घेतले. बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी बलदेव भुता धुर्वे (रा. मनीमपूर) या आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने घरफोडीची कबुली दिली. आरोपीच्या ताब्यातून चोरीस गेलेला ३२ इंची एलइडी टीव्ही आणि होम थिएटर असा एकूण १२,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेल्या मुद्देमालावर कायदेशीर कार्यवाही पूर्ण करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेतन कदम, अप्पर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक राहुल आठवले यांच्या नेतृत्वात पार पडली. यात पोलीस उपनिरीक्षक तुषार चव्हाण, अंमलदार छत्रपती करपते, स्वप्नील बायस्कर आणि अथर्व कोहळे यांचा समावेश होता. या संदर्भात मोर्शी पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, घर बंद ठेवून बाहेर जाताना आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात. तसेच, कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाल आढळल्यास तात्काळ मोर्शी पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे ठाणेदार राहुल आठवले यांनी सांगितले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
https://doonitednews.in/advertisement-rate-card/