
जेजुरी येथे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात 13 जुलै रोजी झालेल्या भीषण अपघातातील मृतांचा आकडा आता चारवर पोहोचला आहे. अपघातात गंभीर जखमी झालेल्या शैलजा दिनकर जगताप (वय 58, रा. कवलापूर, ता. मिरज, जि. सांगली) यांचा पुण्यातील ससून रुग्णालयात उ
.
सांगली जिल्ह्यातील चार महिला वारकऱ्यांचा मृत्यू
या अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये नंदा बाबुराव पवार (60, कवलापूर), माधवी राजाराम सलगरे (55, मालगाव), राजश्री शंकर भोसले (55, कसबे डिग्रज) आणि उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या शैलजा दिनकर जगताप यांचा समावेश आहे. चारही महिला सांगली जिल्ह्यातील असून त्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या.
बेलसर फाट्यावर ट्रकचा भीषण अपघात
पुरंदर तालुक्यातील बेलसर फाटा येथील राजवाडा लॉजसमोर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीतील ट्रकचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत सात ते आठ वारकरी जखमी झाले. जखमींवर सुरुवातीला जेजुरीतील आनंदी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले, तर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात हलविण्यात आले.
जखमी वारकऱ्यांवर उपचार सुरू
या अपघातात शांता शिवाप्पा अलकोपर, कासाबाई जगन्नाथ गस्ते, लक्ष्मी विठ्ठल गडदे, अक्काताई बबन कोळी, गीताबाई सदाशिव हंकारे आणि मंगल विलास पाटील हे वारकरी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
‘नियोजनशून्य पोलिस कारभारामुळे अपघात’
दरम्यान, या अपघातानंतर वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी पोलिस प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितले की, वारीदरम्यान वाहने आणि दिंड्यांसाठी स्वतंत्र मार्ग ठेवण्याचा नियम काटेकोरपणे पाळला गेला असता तर ही दुर्घटना टळू शकली असती. “येतील तशी वाहने आणि दिंड्या सोडल्यामुळे हा अपघात झाला. पोलिसांनी वाहतूक व्यवस्थापनात गंभीर निष्काळजीपणा केला,” असा आरोप त्यांनी केला. पुढील प्रवासात तरी वाहने एका बाजूला आणि दिंड्या दुसऱ्या बाजूला ठेवण्याचा नियम कठोरपणे राबवावा, अशी मागणीही त्यांनी केली.
वाखरी पुलाच्या भरावावरूनही प्रश्नचिन्ह
वारीच्या पार्श्वभूमीवर आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. वाखरी ते पंढरपूर मार्गावरील नव्या पुलाचे उद्घाटनही झाले नसताना त्याच्या भरावाला भेगा पडून तो खचल्याचे उघड झाले आहे. याच मार्गावरून लाखो वारकरी पंढरपुरात प्रवेश करणार असल्याने या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. पुलाची तातडीने दुरुस्ती करून गुणवत्ता नियंत्रण विभागामार्फत चौकशी करण्याची मागणीही होत आहे.
वारीच्या सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह
जेजुरीतील या भीषण अपघातानंतर आषाढी वारीतील वारकऱ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. लाखो भाविक सहभागी होणाऱ्या पालखी सोहळ्यात वाहतूक व्यवस्थापन, सुरक्षा नियोजन आणि आपत्कालीन यंत्रणांची तयारी याबाबत प्रशासनाने अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी वारकरी आणि विविध संघटनांकडून होत आहे. मृतांचा आकडा चारवर पोहोचल्याने या दुर्घटनेचे गांभीर्य आणखी वाढले असून अपघाताच्या कारणांचा सखोल तपास सुरू आहे.
संबंधित बातमी वाचा…
दिंडीवर काळाचा घाला:पंढरपूरच्या आषाढी वारीतील 7 वारकऱ्यांना ट्रकने उडवले, जेजुरीजवळ 3 महिला भाविकांचा मृत्यू, 4 जखमी
आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांवर आज सकाळी मोठा अनर्थ ओढावला. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासोबत पायी चालत निघालेल्या वारकऱ्यांना जेजुरी परिसरातील भोंगळे मळा येथे एका भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून, चार वारकरी गंभीर जखमी झाले आहेत. येथे वाचा संपूर्ण बातमी
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
