
कर्नाटक विधान परिषद निवडणुकीत भाजपला थेट त्यांच्याच ‘क्रॉस व्होटिंग’च्या खेळात मात देऊन 5 जागा जिंकणारे कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी (20 जून) ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून मह
.
डी. के. शिवकुमार यांचे ठाकरे कुटुंबीयांकडून स्वागत करण्यात आले. उद्धव ठाकरे यांनी शाल देऊन त्यांचे आदरातिथ्य केले. या प्रसंगी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतदेखील उपस्थित होते. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाली. सद्य राजकीय परिस्थितीवर यावेळी खल झाल्याचे समजते.
‘मातोश्री’वरुन सुळेंच्या लग्न सोहळ्याला उपस्थिती
उद्धव ठाकरे यांच्याशी अत्यंत महत्त्वाची चर्चा आटोपल्यानंतर डी. के. शिवकुमार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती यांच्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी रवाना झाले.
कर्नाटकात भाजप-जेडीएसला खिंडार
कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून धुरा सांभाळल्यानंतर डी. के. शिवकुमार यांनी पहिल्याच निवडणुकीत भाजपला जोरदार झटका दिला आहे. कर्नाटक विधान परिषदेच्या 7 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसने तब्बल 5 जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे, तर विरोधी पक्ष असलेल्या भाजपला केवळ 2 जागांवर समाधान मानावे लागले. 7 जागांसाठी 8 उमेदवार रिंगणात असल्याने लढत चुरशीची मानली जात होती. मात्र, ऐनवेळी भाजप आणि जेडीएस या दोन्ही विरोधी पक्षांच्या आमदारांनी थेट ‘क्रॉस-व्होटिंग’ केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. या अंतर्गत बंडखोरीमुळे काँग्रेसच्या उमेदवारांना अपेक्षेपेक्षा कितीतरी पटीने जास्त मते मिळाली.
हे ही वृत्त वाचा
ज्यांना परत यायचंय त्यांनी यावे, ठाकरेंचे मन मोठे- आदित्य ठाकरे
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या संभाव्य पक्षांतराची चर्चा आणि त्यांच्या वडिलांच्या हत्या प्रकरणाचा सीबीआय कोर्टाचा निकाल, यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर, शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी ओमराजे निंबाळकर यांच्या भूमिकेवर, पक्षातील बंडखोर खासदारांवर आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या टीकेवर अत्यंत आक्रमक आणि रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. वाचा सविस्तर
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
