
“नदी म्हणजे केवळ पाणी वाहणारा कालवा नव्हे, तर ती संस्कृती आणि निसर्ग यांना जोडणारा प्रवाह असून जीवन, संस्कृती आणि सभ्यतेचा आधार आहे. नद्या कोरड्या पडल्या, तर त्यासोबत संस्कृती आणि सभ्यतेचाही ऱ्हास होतो.” असे प्रतिपादन जलतज्ज्ञ ज्येष्ठ जलसंवर्धन तज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी केले. पुण्यातील छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) प्रेक्षागृह येथे ‘एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठाच्या वतीने आयोजित पुनर्जीवित नदी ‘बद्दह’ या त्यांच्या हिंदी व रिटा रॉड्रिग्ज यांनी अनुवादित केलेल्या मराठी आवृत्तीचा प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. राजेंद्र शेंडे व ज्येष्ठ समाजसेवक जयाजी पाईकराव यांच्या हस्ते आणि एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठाच्या कार्याध्यक्ष प्रा. स्वाती कराड चाटे व संस्थापक कुलगुरू प्रा. डॉ. गोपालकृष्ण जोशी यांच्या उपस्थितीत या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. माईर्स एमआयटी शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांच्या उपस्थितीत सोहळा पार पडला. यावेळी राघवेंद्र एम. चाटे, प्रा. प्रभा कासलीवाल, प्राणेश मुरनाळ यांच्यासह शैक्षणिक, सामाजिक, उद्योग क्षेत्रातील तसेच जलसंवर्धन व पर्यावरण तज्ञ उपस्थित होते. “जलसंवर्धन आणि पर्यावरण संरक्षण हे विषय केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित राहू नयेत, तर विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष कृतीत उतरावेत, या उद्देशाने एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठाने या पुस्तकाच्या प्रकाशनाचा पुढाकार घेतला आहे”, असे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. गोपालकृष्ण जोशी यांनी नमूद केले. नद्यांचे स्वरूप बदलणे हे संस्कृती ह्यासाचे लक्षण डॉ. सिंह म्हणाले ” पुणे हे संस्कृती, शिक्षण आणि विचारांचे शहर आहे. मात्र, या शहरातून वाहणाऱ्या नद्यांची अवस्था चिंताजनक आहे. नद्यांचे स्वरूप बदलणे हे त्या भागातील संस्कृतीचा ह्यास होण्याचे लक्षण आहे. सध्याच्या काळात नद्यांना पुन्हा जीवित करण्याची गरज आहे . जलसंपत्तीचे संवर्धन ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे.”
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
