
पुण्यात ‘प्रॉप कनेक्ट २०२६’ या राष्ट्रीय रियल इस्टेट सल्लागार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. दी प्रोफेशनल रियल्टर्स ऑफ पुणे (प्रॉप) आणि नॅशनल असोसिएशन ऑफ रियल्टर्स-इंडिया (नार-इंडिया) यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद रविवार, ६ जुलै २०२६ रोजी हॉटेल जेडब्ल्यू. मॅरिएट येथे होणार आहे. या एकदिवसीय परिषदेत देशभरातील ३८ शहरांमधील दोन हजारांहून अधिक रियल्टर्स आणि ३०० हून अधिक विकसक सहभागी होणार आहेत. ‘प्रॉप’चे अध्यक्ष उदयन माने आणि ‘प्रॉप कनेक्ट २०२६’चे संयोजक रमेश तोष्णीवाल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या पत्रकार परिषदेला ‘प्रॉप’चे माजी अध्यक्ष दर्शन चावला, उपाध्यक्ष तनुज नगरानी (बिल्डर रिलेशन्स अँड स्पॉन्सरशिप), नीरज सिंग (टेक्नॉलॉजी अँड कम्युनिकेशन), सचिव मनीष दीडमिसे, खजिनदार मुरली रमनी उपस्थित होते. तसेच, दिनेश राठी (संचालक – ट्रेनिंग अँड मेंबरशिप सर्कल), सारंग मद्रेवार (संचालक – स्पोर्ट्स अँड कल्चरल फंक्शन्स), महेश यादव (संचालक – प्रॉप ग्रोथ), रवींद्र यादव (संचालक – डिजिटल पीआर/मीडिया), विक्रम मलिक (संचालक – बिझनेस एक्स्चेंज अँड क्रॉस सेल) आणि प्रीत कोहली (संचालक – इव्हेंट्स, एंगेजमेंट अँड नेटवर्किंग) यांचीही उपस्थिती होती. ‘प्रॉप’चे अध्यक्ष उदयन माने यांनी सांगितले की, ‘रियल्टर्स – फ्युएलिंग द फ्युचर’ या संकल्पनेवर आधारित ही परिषद रियल इस्टेट क्षेत्रातील तज्ज्ञ, विकसक, धोरणकर्ते आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील मान्यवरांना एकत्र आणेल. नेटवर्किंग, ज्ञानविनिमय आणि व्यवसायवृद्धीसाठी हे एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे. ही परिषद रियल्टर समुदायाच्या कार्याचा गौरव करेल आणि देशातील संघटित रियल इस्टेट क्षेत्राला एकत्र आणण्यास मदत करेल. माने यांनी पुढे नमूद केले की, परिषदेत पुण्याच्या भविष्यातील विकास, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ऑटोमेशन, उद्योजकता आणि व्यवसाय विस्तार यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभेल. ‘प्रॉप कनेक्ट २०२६’चे संयोजक रमेश तोष्णीवाल यांनी परिषदेतील प्रमुख सत्रांची माहिती दिली. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त डॉ. अभिजित चौधरी पुण्याच्या पुढील विकासाच्या दिशेवर व्याख्यान देतील. ‘द पंचशील स्टोरी’ या विशेष संवादामध्ये अतुल चोरडिया सहभागी होणार आहेत. याशिवाय, ‘स्टोरी ऑफ द टायटन्स’ या सत्रात देशातील आघाडीचे विकसक रियल इस्टेट क्षेत्राच्या भविष्यावर चर्चा करतील. पुण्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिकही विविध चर्चासत्रांमध्ये सहभागी होणार आहेत, असे तोष्णीवाल यांनी सांगितले. माजी अध्यक्ष दर्शन चावला यांनी परिषदेतील इतर महत्त्वाच्या वक्त्यांची माहिती दिली. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ऑटोमेशन या विषयावर वैभव सिसिंटी मार्गदर्शन करतील, तर सीए सार्थक आहुजा २०२७ मधील रियल इस्टेट बाजारपेठेचा आढावा सादर करतील. राजीव तलरेजा व्यवसाय विस्तारावर मार्गदर्शन करणार आहेत. परिषदेची सांगता विनोदी कलाकार विपुल गोयल यांच्या विशेष कार्यक्रमाने होईल.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
