हा सगळा पैशांचा खेळ: ऑपरेशन टायगरवर चंद्रकांत खैरे म्हणाले- राऊतांनी सांगितलेल्या आकड्यापेक्षा जास्त टोकन दिलं गेलं – Maharashtra News

हा सगळा पैशांचा खेळ:  ऑपरेशन टायगरवर चंद्रकांत खैरे म्हणाले- राऊतांनी सांगितलेल्या आकड्यापेक्षा जास्त टोकन दिलं गेलं – Maharashtra News



महाराष्ट्रातील ‘ऑपरेशन टायगर’ आणि ठाकरे गटातील संभाव्य खासदार फुटीवर शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी अत्यंत तीव्र संताप व्यक्त केला आहे. खैरे यांनी सत्ताधारी आणि बंडखोर खासदारांवर कडाडून टीका केली. ज्यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी शून्यातून मोठं केलं, राजकारणात पदे दिली, तेच आज ठाकरेंचे झाले नाहीत,” अशा शब्दांत खैरेंनी बंडखोरांवर प्रहार केला. राऊतांनी सांगितलेल्या आकड्यापेक्षा जास्त टोकन खासदार संजय राऊत यांनी बंडखोर खासदारांना १५ कोटींचा ॲडव्हान्स (टोकन) दिल्याचा आरोप केला होता. यावर खैरे यांनी आणखी एक मोठा दावा केला. खैरे म्हणाले, “हा सगळा पैशांचा खेळ सुरू आहे. संजय राऊत यांनी जो आकडा सांगितला आहे, प्रत्यक्षात बंडखोरांना त्यापेक्षाही जास्त रकमेचे टोकन दिले गेले आहे. पैशांच्या जोरावर लोकप्रतिनिधींना पळवले जात आहे.” हे खोटं बळ आहे, राजकारणातील प्रामाणिकपणा संपला सत्ताधारी महायुतीवर निशाणा साधताना चंद्रकांत खैरे म्हणाले की, दुसऱ्यांचे पक्ष फोडून, खासदारांची फाटाफूट करून तुम्ही जे संख्याबळ वाढवत आहात, ते निव्वळ ‘खोटं बळ’ आहे. याला जनतेची मान्यता नाही.” राजकारणाच्या घसरलेल्या पातळीवर खंत व्यक्त करताना ते पुढे म्हणाले की, आजचे राजकारण आता अजिबात प्रामाणिकपणाचे राहिलेले नाही. असे खेरे एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले. मी उद्धव ठाकरेंसोबतच राहणार: डोळ्यांत पाणी आणून राजाभाऊ वाजेंकडून फुटीच्या चर्चांना पूर्णविराम शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील संभाव्य फुटीच्या चर्चांदरम्यान खासदार राजाभाऊ वाजे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत आपण पक्ष सोडणार नसल्याचे ठामपणे सांगितले. मी पक्ष सोडणार नाही, मी पहिल्या दिवसापासून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत आहे आणि पुढेही त्यांच्यासोबतच राहणार, अशा कडक शब्दांत वाजेंनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांच्या या विधानामुळे ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. सविस्तर वाचा

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp