
काँग्रेस पक्षातून जे जे घटक बाहेर पडले आहेत त्यांनी आपले पक्ष निर्माण केले आहेत त्यांनी एकत्र काँग्रेसच्या झेंड्याखाली येत काँग्रेसची ताकद वाढवण्याची गरज आहे. मग त्यामध्ये तृणमूल काँग्रेस असेल किंवा महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवारांच्या गटात विलीन होण्यापेक्षा त्यांनी काँग्रेसमध्ये विलीन व्हावे असे मी म्हटलो होतो. हे मी तेव्हा बोललो होतो. आता तो विषय संपला आहे. तेलंगणा, ओडिशामध्ये अनेक घटक बाहेर पडत त्यांनी स्वत:चा पक्ष स्थापन केला यांनी काँग्रेसमध्ये यावे असे मत मी व्यक्त केले होते, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, जे नेते काँग्रेसमधून बाहेर पडले त्यांना राज्यात काँग्रेसच्या सहकार्यांची गरज आहे. मग तसे करण्यापेक्षा त्यांनी काँग्रेससोबत आले पाहिजे आणि देशासमोर एक मजबूत पर्याय दिला पाहिजे असे माझे मत होते. काँग्रेस आणि इतर घटक पक्षात यासंदर्भात चर्चा सुद्धा सुरू आहे. देशातील 56 न्यायाधीश हे लंडनमध्ये सरकारी खर्चाने बॅटमिंटन खेळत आहेत. किती दिवस झाले? खर्च कोण करतंय? तिथे पार्ट्या सुरू आहेत. याविषयी सर्वांनी बोलले पाहिजे. न्यायव्यवस्थेने राजकीय व्यवस्थेपासून अंतर ठेवले पाहिजे. बकवास न्यायव्यवस्था मोदी यांनी केली आहे. कसला घंटा नारी सन्मान करता? संजय राऊत म्हणाले की, मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज अमित शहा यांच्या दबावाखाली फेटाळण्यात आला आहे. काँग्रेसची उमेदवार निवडून आणण्याइतकी ताकद तिथे होती. मुळात त्यांनी कोणताही एफआयआर लपवला नाही. झारखंडमध्ये एका भाजप पुरस्कृत उमेदवाराला तृटीसाठी 24 तासांचा वेळ दिला मग तोच न्याय नटराजन यांना का नाही. दोघांना एक नियम लागू होत नाही का? एका महिलेसाठी हा नियम लागू करत नाही. मग कसला घंटा नारी सन्मान करता. संपर्क होणे सामान्य गोष्ट! संजय राऊत म्हणाले की, भाजपकडून विनायक राऊत यांना संपर्क साधला म्हणून काय झाले. सभागृहात आमचे आणि भाजपचे लोकं एकत्रच बसलेले असतात. त्यामुळे संपर्क होतच असतो. त्यात काही वेगळे नाही. देशात कसली घंटा नारी सन्मान योजना आहे. काल मध्यप्रदेशमध्ये मीनाक्षी नटराजन यांचा राज्यसभेचा उमेदवारी अर्ज बाद केला हा काय नारी सन्मान झाला का? असा सवाल राऊतांनी केला आहे. त्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या नेत्या आहेत. त्यांनी कोणताही गुन्हा लपवून ठेवला नाही. केवळ एक नोटीस होती FIR नाही तिचा उल्लेख नाही म्हणून उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला आहे. आमचा एकही खासदार कुठेही जाणार नाही! संजय राऊत म्हणाले की, आमच्या पक्षाचे कोणतेही खासदार कुठेही जात नाहीत. सर्व जण पक्षासोबत मजबुतीने उभे आहेत. लोकसभेच्या निवडणुकीला अजून 3 वर्षे बाकी आहेत. सर्वच खासदारांचे आणि शिवसेना पक्षप्रमुखांचा संवाद सुरू आहे. हे लोकं म्हणतात तृणमूल काँग्रेसमध्ये फुट पडली आहे. त्यांचे 20 खासदार फुटले जे फुटली त्यांचे नावे का समोर येत नाहीत? असा सवाल राऊत यांनी केला आहे. अमित शहा हे फुटले फुटले म्हणतात मग ते खासदार फुटतात. एखाद्याच्या मनात बेईमानीचा किडा गेला तर तो व्यक्ती पक्ष सोडतो. त्याला कारण आहे ते निवडणूक आयोग आणि देशाचे गृहमंत्री, ईडी, सीबीआय, न्यायालय. जो पर्यंत या संस्था पक्षासाठी काम करतील तो पर्यंत हे थांबणे शक्य नाही.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
