हिंगोलीत मोठी चोरी! गोदामाचे शटर वाकवून 20 लाखांची हळद लंपास: लिंबाळा एमआयडीसीतील घटना, ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल – Hingoli News

हिंगोलीत मोठी चोरी! गोदामाचे शटर वाकवून 20 लाखांची हळद लंपास:  लिंबाळा एमआयडीसीतील घटना, ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल – Hingoli News


हिंगोली शहरालगत लिंबाळा औद्योगिक वसाहतीमधून चोरट्यांनी गोदामाचे शटर वाकवून 19.99 लाख रुपये किंमतीचे 353 कट्टे हळदीचे पोते चोरट्यांनी पळविल्याची घटना घडली असून या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात रविवारी ता. 7 गुन्हा दाखल झाला आहे.

.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली शहरालगत औद्योगिक वसाहतीमध्ये स्टार ॲग्रोवेअर हाऊसिंग मॅनेजमेंट कंपनीचे गोदाम आहे. या ठिकाणी शेतकरी तसेच कंपनीचा शेतीमाल ठेवण्यात येतो. गोदामाच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी कंपनीचे कर्मचारी देखील तैनात आहेत.

दरम्यान, ता. 11 मे ते ता. 23 मे याकालावधीत चोरट्यांनी गोदामाचे शटर वाकवून गोदामातील हळदीचे पोते चोरले याची तपासणी करण्यात आली होती. यामध्ये कंपनीकडून सर्व गोदामातील शेतीमालाच्या पोत्यांची तपासणी करण्यात आली होती. त्यामध्ये गोदामातील 353 कट्टे कमी असल्याचे दिसून आले. या हळदीचे वजन 181 क्विंटल असून त्याची किंमत 19.99 लाख रुपये एवढी आहे.

या प्रकरणी कंपनीचे व्यवस्थापक किरण कवडे यांनी आज हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यामध्ये चोरट्यांनी गोदामाचे शटर वाकवून हळदीचे पोते चोरून नेल्याचे तक्रारीत नमुद केले. यावरून पोलिसांनी चोरट्यां विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक विष्णूकांत गुठ्ठे, उपनिरीक्षक राहुल घुले, जमादार सुधीर ढेंबरे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. उपनिरीक्षक घुले पुढील तपास करीत आहेत.

दरम्यान, एकाच वेळी चोरट्यांनी 353 कट्टे हळद पळविल्याची घटना संशयास्पद असून हळदीचे कट्टे पळवितांना कंपनीचे तैनात केलेले सुरक्षा रक्षक कुठे होते तसेच इतर कर्मचाऱ्यांच्या हा प्रकार कसा लक्षात आला नाही. याबाबत उलट सुलट चर्चा सुरु झाली आहे. या प्रकरणात आता पोलिसांनी त्या कालावाधीतील औद्योगिक वसाहतीमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासणीचे काम सुरु केल्याचे सुत्रांनी सांगितले.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp