शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा: नाशिकमधील ‘राष्ट्रवादी’ भवनात रंगला कार्यक्रम – Nashik News

शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा:  नाशिकमधील ‘राष्ट्रवादी’ भवनात रंगला कार्यक्रम – Nashik News



महाराष्ट्राचे आराध्य दैवत सिंहासनाधीश्वर महाराजाधीराज छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५२ वा राज्याभिषेक दिन राष्ट्रवादी भवन येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी शिवरायांच्या कार्याचे महत्त्व विशद केले. शहराध्यक्ष रंजन ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. पारतंत्र्य झुगारून स्वराज्याचं स्वप्न दाखवणारे आणि ते साकारणारे म्हणजे महाराज. अठरापगड जातींची मोट बांधून सामाजिक एकोपा जपणारे म्हणजे महाराज. आया बहिणींच्या, गोरगरीब रयतेच्या रक्षणासाठी झटणारा म्हणजे आपले महाराज. त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून महाराष्ट्राला स्वाभिमान आणि न्यायाचा मार्ग दाखवला. संपूर्ण जगाला राज्यकारभार कसा चालवावा याचा आदर्श परिपाठ घालून दिला. राज्याभिषेकाच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. शहराध्यक्ष रंजन ठाकरे म्हणाले की, महाराजांनी भारतीयांमध्ये स्वराज्याची आस जागृत करत, परकियांच्या आक्रमणातून हिंद प्रांताला वाचवले. मराठ्यांच्या इतिहासातील सुवर्णक्षण आणि शिवरायांच्या प्रत्येक भक्ताला स्वाभिमान वाटेल असा दिवस म्हणजे शिवराज्याभिषेक दिन. शिवरायांचे शौर्य, त्यांचे कार्य आठवून प्रत्येक जण या दिवशी पुन्हा त्यांच्यासमोर नतमस्तक होत असतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज नसते तर भारताचा इतिहास आणि भूगोल यांपैकी काहीही शिल्लक राहिले नसते. शहराध्यक्ष रंजन ठाकरे म्हणाले की, अत्यंत प्रतिकूल काळात अनेक राजे-महाराजे मुघलांचे मांडलिकत्व स्वीकारून कार्य करत असताना, राजमाता जिजाऊ माँसाहेब यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना, हिंदुस्थान आणि मराठी मुलखाला मुघलांच्या जोखडातून मुक्त करून ‘रयतेचे राज्य’ स्थापन करण्याची प्रेरणा व ध्येय दिले. अठरापगड जातींना एकत्रित करत छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना केली. समता, सन्मान, न्याय आणि महिला सुरक्षा यांसह सर्वसमावेशक राज्यव्यवस्था उभी केली. करप्रणालीतील सुधारणा, जलव्यवस्थापन, वनसंवर्धन तसेच जलदुर्गांच्या उभारणीतून सागरी सुरक्षेला दिलेले महत्त्व हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दूरदृष्टीचे प्रतीक असल्याचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे सांगितले. कार्यक्रमाला प्रमोद सोनवणे, संतोष शेळके, डॉ. सागर कारंडे, शहर सरचिटणीस संजय खैरनार, मुख्तार शेख, दत्ताकाका पाटील, मनोहर कोरडे, मकरंद सोमवंशी, शंकर मोकळ, नगरसेविका सीमा ठाकरे, जागृती गांगुर्डे, विक्रम कोठूले, नईम शेख, श्रीकांत काळे, योगेश दिवे, मोतीराम पिंगळे, बंटी कोरडे, अलताफ पठाण, मुकेश शेवाळे, डॉ. संदिप चव्हाण, संतोष भुबजळ, व्यंकटेश जाधव, अक्षय परदेशी, हर्षल चव्हाण, राहुल कमानकर, किरण पानकर, सुधाकर इस्ते, मनोज मोगल, सचिन पाळदे, विनोद शर्मा, संतोष भागवत, जितेंद्र भूपताबी, अशोक बिरारी, नंदू भूसपटे, संदिप खैरे, तुषार जगताप, रवि अहिरे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp