अकोल्यात गुरुवारपर्यंत मान्सूनचे आगमन शक्य: अर्धा मान्सून केरळमध्ये दाखल; उर्वरित वळला अंदमान निकोबारच्या दिशेने‎ – Akola News

अकोल्यात गुरुवारपर्यंत मान्सूनचे आगमन शक्य:  अर्धा मान्सून केरळमध्ये दाखल; उर्वरित वळला अंदमान निकोबारच्या दिशेने‎ – Akola News



मान्सून गोव्यापर्यंत पोहोचला असला तरी तो अद्याप फारसा सक्रिय झालेला नाही. सध्या राज्यात पूर्व-मोसमी पाऊस सुरू असून, महाराष्ट्रासह विदर्भातील अकोल्यात १० तारखेपर्यंत मान्सून धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वाऱ्यांची गती व दिशा बदलल्यामुळे महाराष्ट्रात अपेक्षित असलेली पावसाची जोरदार झड अद्याप आलेली नाही. सध्या अरबी समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर बाष्प येत आहे. ढगाळ वातावरण व तुरळक पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. मान्सून कर्नाटकापर्यंत पोहोचला असून, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी (कोकण), पुणे, सातारा आणि सोलापूर या भागात पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. दुसरीकडे, अरबी समुद्राचे काही वारे राजस्थान आणि दिल्लीपर्यंत पोहोचले असून तेथून ‘यू-टर्न”” घेत जळगाव, इंदूर मार्गे अकोला आणि नागपूरसह विदर्भाकडे वळत आहेत. यामुळे विदर्भातही पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या कोकण, पुणे, सातारा येथपर्यंत मान्सून पोहोचण्याची शक्यता असून तेथून तो विदर्भाकडे येईल. महाराष्ट्रात मान्सूनचा मुख्य पाऊस १० तारखेच्या आसपास सुरू होईल. विदर्भातही या काळात मान्सूनचा पाऊस अपेक्षित आहे. वाऱ्यांची दिशा बदलल्यामुळे महाराष्ट्रात अजूनही मान्सूनचे जोरदार वारे पोहोचलेले नाहीत. जर वाऱ्यांची दिशा सरळ असती, तर आतापर्यंत महाराष्ट्रात मान्सूनचा प्रवेश होऊन पावसाची चांगली झड पाहायला मिळाली असती, असे हवाानतज्ञांनी सांगितले. प्रा. डॉ. सुरेश चोपने, हवामानतज्ञ. ७५ मिमी पावसानंतरच पेरणी करण्याचा सल्ला सध्याच्या पूर्व-मोसमी किंवा तुरळक पावसावर अवलंबून राहून शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, किमान ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्यावर पेरणी करावी, असा सल्ला कृषी तज्ञांनी दिला आहे. जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण होण्यासाठी सलग दोन-तीन चांगल्या पावसाची गरज असते. घाईघाईत पेरणी केली आणि त्यानंतर पावसात आठवड्याभराचा खंड पडला, तरी कोरड्या जमिनीत बियाणे खराब होण्याची शक्यता असते. अल निनोमुळे विलंब वाऱ्यांची दिशा बदलल्याने मान्सूनला विलंब झाला आहे. ‘अल निनोमुळे मान्सूनच्या वाऱ्यांवर परिणाम झाला. कन्याकुमारी, श्रीलंका, अंदमान निकोबारमध्ये समुद्राचे तापमान अपेक्षेपेक्षा अधिक वाढल्याने मान्सूनचे वारे थेट महाराष्ट्राकडे (केरळ-गोवा-मुंबई मार्गे) न येता दुसरीकडे वळले आहेत.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp