चुलत भावाच्या कुटुंबाची प्रगती सहन झाली नाही: रागात जंगलात नेऊन भोसकले, त्याच्याच फोनवरून मागितली खंडणी‎ – Chhatrapati Sambhajinagar News

चुलत भावाच्या कुटुंबाची प्रगती सहन झाली नाही:  रागात जंगलात नेऊन भोसकले, त्याच्याच फोनवरून मागितली खंडणी‎ – Chhatrapati Sambhajinagar News



चुलत भावाचा खून करून मृतदेह जंगलात‎फेकून दिला, त्यानंतर तो बेपत्ता असल्याचे‎‎भासवण्यासाठी मृताच्याच‎‎मोबाइलवरून त्याच्या‎‎वडिलांना मेसेज करून‎‎पैशांची मागणी केली‎‎आणि स्वतःच पोलिस‎‎ठाण्यात जाऊन तो‎‎हरवल्याची तक्रार दिली.‎‎अत्यंत थंड डोक्याने कट‎रचून केलेला या गुन्ह्याचा सिडको पोलिसांनी‎पर्दाफाश केला आहे. अपहरणाचा बनाव‎रचणाऱ्या आरोपी चुलत भावाला मोबाइल‎लोकेशनच्या आधारे गजाआड करण्यात आले‎आहे. राजू रामू बनसोड (२५, रा. पाथ्री, ता.‎फुलंब्री) असे मृताचे नाव असून आरोपी रोहित‎बनसोड याला बेड्या ठोकल्या आहेत.‎ राजू आणि रोहित यांचे कुटुंब मजुरी करणारे‎होते. राजूचे कुटुंब मात्र शहरात येऊन‎स्थिरावले. या प्रगतीचा मत्सर रोहितला वाटत‎होता. याच ईर्षेतून त्याने हत्येचा कट रचला.‎घटनेच्या दिवशी आरोपीने राजूला पाथ्री येथे‎नेले. तेथे घनदाट जंगलात भोसकून त्याची‎हत्या केली व मृतदेह तेथेच टाकून दिला.‎ तपासाला लागले १४ दिवस मृत राजू २४ मे रोजी बेपत्ता‎झाल्याची तक्रार सिडको पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. त्यानंतर‎त्याच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात चकरा मारून तपासासाठी पोलिसांकडे‎तगादा लावला. त्यामुळे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. मृत आणि‎त्याचा चुलत भाऊ यांचे मोबाइल लोकेशन वारंवार एकाच ठिकाणी‎आढळल्याने खुनाचा उलगडा झाला. त्यासाठी १४ दिवस लागले.‎ कुजल्यामुळे जागेवरच शवविच्छेदन अन् अंत्यसंस्कार‎ मृतदेह पंधरा दिवसांपासून जंगलात पडून असल्याने तो अत्यंत कुजलेल्या‎अवस्थेत होता. त्यामुळे घटनास्थळावरच त्याचे शवविच्छेदन करण्यात आले.‎रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास राजूवर अंत्यसंस्कार करण्यात आले.‎त्याच्या पश्चात आई, वडील आणि एक लहान भाऊ असा परिवार आहे. या‎गुन्ह्याची उकल सिडको पोलिसांनी केली.‎ एकाच मोबाइल लोकेशनमुळे घटनेचा उलगडा‎ मुलगा बेपत्ता झाल्याने आणि पैशांचा मेसेज आल्याने कुटुंबीय भयभीत झाले‎होते. त्यांनी शोधाशोध सुरू केली. पोलिसांचा आपल्यावर संशय येऊ नये‎म्हणून आरोपी रोहितने स्वतःच सिडको पोलिस ठाण्यात जाऊन राजू बेपत्ता‎असल्याची तक्रार नोंदवली. राजू गेल्या १५ दिवसांपासून बेपत्ता होता आणि‎त्याचदरम्यान त्याच्या मोबाइलवरून रोहित राजूच्या वडिलांना मेसेज करत‎होता. ही बाब वडिलांनी पोलिसांना सांगितली. त्यावरून पोलिसांनी संशयित‎रोहित आणि मृताच्या मोबाइलचे लोकेशन तपासले असता ते एकच‎असल्याचे समोर आले. संशयाची सुई रोहितकडे वळताच पोलिसांनी त्याला‎ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने हत्येची कबुली दिली आणि‎मृतदेह जंगलात फेकून दिल्याचे सांगितले.‎

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp