digital products downloads

सुषमा अंधारेंनी ट्रोलर्सनाच केले ट्रोल: राणे कुटुंब, भुजबळ, अशोक चव्हाण, चित्रा वाघ, भुजबळ, मुश्रीफ, तटकरे कुणालाही सोडले नाही – Maharashtra News

सुषमा अंधारेंनी ट्रोलर्सनाच केले ट्रोल:  राणे कुटुंब, भुजबळ, अशोक चव्हाण, चित्रा वाघ, भुजबळ, मुश्रीफ, तटकरे कुणालाही सोडले नाही – Maharashtra News



शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी विधान परिषदेची संधी हुकल्यामुळे त्यांना ट्रोल करणाऱ्यांनाच ट्रोल केले आहे. या प्रकरणी त्यांनी भाजपच्या एका व्यक्तीने त्यांच्यावर व्यंगचित्राद्वारे केलेल्या टीकेचा दाखला देत ट्रोल करताना त्याला सुद्धा एक दर्जा लागत असल्याचा दावा केला आहे. भरत थेऊरकर पाटील नामक फेसबुक अकाउंटवरून सुषमा अंधारे यांचे एक व्यंगचित्र पोस्ट करण्यात आले आहे. त्यात सुषमा अंधारे, उद्धव ठाकरेंकडे विधान परिषदेच्या उमेदवारीचा हट्ट धरताना दिसून येत आहेत. विधान परिषद आमदारकीचे तिकीट मिळवण्यासाठी सुषमा अंधारे उत्सुक होत्या, पण त्यांची उंची कमी पडली, अशी उपरोधिक टिप्पणी या पोस्टवर करण्यात आली होती. सुषमा अंधारे यांनी या पोस्टचा स्क्रीनशॉट शेअर करत आपल्याला ट्रोलची ही पोस्ट अत्यंत दर्जेदार असल्याची उपरोधिक टिप्पणी केली. यावेळी त्यांनी नारायणे राणे व त्यांची दोन्ही मुले, अशोक चव्हाण, भुजबळ, हसन मुश्रीफ, सुनील तटकरे आदींचा उल्लेख करत प्रत्येकावर झोंबणारा निशाणा साधला आहे. खाली वाचा सुषमा अंधारेंची पोस्ट जशीच्या तशी सुषमा अंधारे आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, ट्रोल करताना ट्रॉलिंगला सुद्धा एक दर्जा असला पाहिजे. दोन दिवसाच्या ट्रोलिंग मध्ये सगळ्यात दर्जेदार आणि मला आवडलेलं हे व्यंगचित्र आहे. भारतीय जनता पार्टीच्या कामगार सेनेच्या कुण्या पाटलाने हे शेअर केलं. आता भाजपचा कामगार म्हटल्यावर त्याचे ब्रेड बटर याच्यावरच चालणार. त्यामुळे तो त्याच्या उपजीविकेसाठी करत आहे हे समजून घ्या आणि त्याला माफ करा.

आता जरा पुढे जाऊया, हां तर या चित्रामध्ये मी सन्मानाने पक्षप्रमुखांकडे विधान परिषदेचा हट्ट धरते. फारच सुंदर कल्पना आहे. घरातल्या व्यक्ती या आपल्या कुटुंबप्रमुखाकडेच हट्ट करतात. घरातला बाप सोडून शेजाऱ्याला ते बाप म्हणत नाहीत. आणि बापाने आपला हट्ट पुरवला नाही तर ते बापाला सोडून दारोदार नवा बाप शोधत नाहीत. हा ट्रोलिंग कामगार भलेही वेठबिगार असेल. पण याने जे या चित्रात दाखवलं ते फार महत्त्वाचं. कारण जिथे कुणी प्रकाश आंबेडकरांचा फोटो आपल्या कार्यालयात लावून त्यांना आपला दैवत बाप म्हणून नंतर भूमिका बदलल्या. किंवा कोणी निवडणुकीत म्हणाला बिरोबाची शपथ माझ्या कुटुंबातला जरी कुणी उभं राहिलं तरी भाजपला मतदान करू नका ते नंतर भाजपसाठी वाटेल ते करायला लागले.

सदाभाऊ खोत सारखा माणूस एकेकाळी राजू शेट्टींना आपला जिगर मित्र बाप भाऊ म्हणत होता त्यांच्याही भूमिका आता बदलल्या आहेत. महादेव जानकर यांना एकेकाळी मान्यवर कांशीरामजी वैचारिक आदर्श वाटत होते. आता मात्र…. असो. प्रज्ञा सातव आपल्या सात पिढ्यांचा दाखला देत आपण काँग्रेसचे किती प्रामाणिक आहोत हे सांगत होत्या. पण भूमिका बदलली. बच्चु भाऊंचा विषय तर स्वतंत्र ग्रंथ लेखनाचा विषय आहे…! राणेंना आधी बाळासाहेब ठाकरे बाप वाटायचे. मग काही काळ त्यांचं कुलदैवत दिल्लीच्या सोनिया गांधी झाल्या. सध्या ते नागपूरच्या आसरा म्हसोबाला पुजतात. त्यातही त्यांच्या दोन मुलांनी दोन वेगवेगळे बाप माणूस निवडले आहेत. अशोक चव्हाण यांचा बाप भाऊ चुलता सब कुछ काँग्रेस होतं. पण ED च्या दप्तराने त्यांचं गोत्र बदललं. चित्रा वाघ एकेकाळी पवार साहेबांना बाप म्हणायची… भुजबळ मुश्रीफ तटकरे वळसे पाटील हे माझ्यापेक्षा प्रचंड श्रेष्ठ आहेत पण आपला राजकीय बाप थकलाय म्हटल्यावर त्यांना सुद्धा कालाय तस्मै नमः करत फडणवीसांनी आखून दिलेल्या फॅमिली ट्री सोबत नातं जोडावच लागलं… ज्या सांगलीच्या चंद्रहार पाटलांच्या साठी आम्ही पश्चिम महाराष्ट्रातल्या संपूर्ण काँग्रेसची वैर घेतले त्या चंद्रहारला अचानक त्याचा बाप बदलल्याची जाणीव झाली. राखी जाधव, देवरुखकर, बडगुजर असे अजून खूप सार्‍या चिल्लर खुरट्या झाडाझुडपांचा इथे उल्लेख करता येईल पण त्यामुळे लेख उगाच पाल्हाळ लावल्यासारखा होईल. पण काहीही असो. हे व्यंगचित्र आवडलं मला. कारण या व्यंगचित्रात मी माझ्या कुटुंबप्रमुखा सोबत आहे, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp